महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ST Worker Strike : एसटी महामंडळ विलीनीकरणावर मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय काय? उच्च न्यायालयात आज सुनावणी - st worker strike hearing high court

एसटी विलनीकरणाबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार ( ST Worker Strike ) आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एसटी विलनीकरणासंदर्भात असलेला अभिप्रायही आज सादर केला जाणार ( Uddhav Thackeray Opinion St Worker Strike ) आहे.

ST Worker Strike
ST Worker Strike

By

Published : Feb 25, 2022, 1:44 PM IST

मुंबई - एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबत अहवालावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार ( St Worker Strike Hearing High Court ) आहे. दुपारी 2.30 वाजता ही सुनावणी पार पडणार आहे. राज्य सरकारतर्फे विलीनीकरणाबाबत अहवाल बंद लिफाप्यात सादर करण्यात येणार असल्याने त्यात नक्की काय दडलं आहे, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अभिप्राय काय असेल, ते पाहणे देखील महत्वाचं असणार ( Uddhav Thackeray Opinion St Worker Strike ) आहे.

मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. या सुनावणीत त्रिसदस्यीय समितीच्या अहवालासह त्यावरील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अभिप्राय सीलबंद लिफाफ्यात कोर्टापुढे सादर करण्यात आलेला. पण, मुख्यमंत्र्याच्या अभिप्रायावर त्यांची स्वाक्षरी नसल्याने हा त्यांच्या अभिप्राय आहे का? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला होता. त्यामुळे आज परत तो अहवाल सादर करण्यात येणार आहे.

28 ऑक्टोबरला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला होता. राज्याची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटीची वाहतूक गेल्या 100 दिवसांहून अधिक काळासाठी बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. या संपामुळे एसटी महामंडळाचे तब्बल 1600 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एसटीच्या 82 हजार 498 कर्मचाऱ्यांपैकी 54 हजार 396 कर्मचारी अजूनही संपत सहभागी आहेत. तर 28 हजार 93 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.

दरम्यान, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय हा धोरणात्मक आहे. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी वेळ लागेल, अशी माहिती यापूर्वी दिली होती. तर, सेवाज्येष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिल्याचेही राज्य सरकारने न्यायालयात सांगितले होते. आता, आज अहवालात नक्की काय आहे आणि अहवालावर काय सुनावणी होते याकडेच साऱ्या महाराष्ट्राच लक्ष लागलं आहे.

हेही वाचा -Income Tax Raids : लक्षात ठेवा! तपास यंत्रणा दुधारी तलवार, त्या दोन्ही बाजूने वापरता येतात -पेडणेकर

ABOUT THE AUTHOR

...view details