मुंबई -कोरोना विषाणु संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील मातोश्री निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक व्हिडिओ कॉन्फरन्स वरून होणार आहे. या वेळी बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रदीप व्यास, सचिव आरोग्य विभाग, मनपा आयुक्त उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्स वरून सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी सहभागी होणार आहेत.
हेही वाचा -Coronavirus : पोल्ट्री व्यवसायाला सहाय्य करा, व्यवसायिकांची सरकारकडे मागणी
१५ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर १ हजार ५८४ विमानांमधील १ लाख ८१ हजार प्रवासी तपासण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकुण १०४३ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ७५८ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ६६९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर ३२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील विविध विलगीकरण कक्षामध्ये ७५ संशयित रुग्ण भरती आहेत.
हेही वाचा -कल्याण पूर्वेत आढळला 'कोरोना'चा पॉझेटिव्ह रुग्ण