महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आरोपीला दया माया दाखवणार नाही - उद्धव ठाकरे - वर्धा जळीत प्रकरण

हिंगणघाटच्या घटनेतील गुन्हेगाराला दया माया दाखवली जाणार नाही. या सर्वांचा पाठपुरावा करून निकाल लागल्यानंतर अंमलबजावणीसाठी मी उशीर करणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

CM Uddhav thackeray
आरोपीला दया माया दाखवणार नाही - उद्धव ठाकरे

By

Published : Feb 10, 2020, 3:20 PM IST

Updated : Feb 10, 2020, 3:59 PM IST

मुंबई - हिंगणघाट घटनेचे वेगळे वर्णन करण्याची गरज नाही. सर्वांनी धीर धरण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आरोपीवरचा गुन्हा लवकरात लवकर सिद्ध करून पीडितेच्या हत्येला जबाबदार असलेल्या आरोपीला हत्येची जी काही शिक्षा असते ती दिल्याशिवाय हे सरकार शांत बसणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगणगाट घटनेवर व्यक्त केली.

आरोपीला दया माया दाखवणार नाही - उद्धव ठाकरे

मी सर्वांच्या भावनेशी सहमत आहे. अशा घटनेला राज्यात थारा नाही आणि आरोपींना दया माया दाखवली जाणार नाही. या सर्वांचा पाठपुरावा करू निकाल लागल्यावर अंमलबजावणीसाठी मी उशीर होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. हैदराबादसारखा कायदा न करता त्यात बदल करून कायदा कडक करण्यात येईल, जेणेकरून अशा प्रकारचे कृत्य कोणी करणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Last Updated : Feb 10, 2020, 3:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details