महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 4, 2020, 11:07 PM IST

Updated : Dec 5, 2020, 6:45 AM IST

ETV Bharat / city

मुख्यमंत्री आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शनिवार 5 डिसेंबर 2020 रोजी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (शनिवार) 5 डिसेंबर 2020 रोजी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यात ते अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांना प्रत्यक्ष भेटी देणार आहेत.

कसा असले मुख्यमंत्र्यांचा दौरा?-

  • सकाळी 10.20 वाजता मुंबईहून विमानाने नागपूर विमानतळ येथे आगमन.
  • हेलिकॉप्टरमधून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खांदेश्वर येथील शिवणी रसुलापूर , मौजे देऊळगव्हाण हेलिपॅड येथे प्रयाण.
  • 11.15 वाजता मोटारीने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी व राखीव
  • दुपारी 12.15 वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मौजे गोळवडीकडे प्रयाण.
  • दुपारी 2 वाजता गोळवडी हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी व राखीव.
  • दुपारी 3.10 वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे प्रयाण. औरंगाबाद येथे आगमन व 3.35 वाजता विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण

समृद्धी महामार्ग महत्वाचा प्रकल्प-

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी) कडून हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते नागपूर हे 700 किमीचे अंतर काही तासात सहज पार करता येणार आहे. हा प्रकल्प राज्य सरकारसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळेच या प्रकल्पाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. पण गेल्या तीन महिन्यापासून मात्र या प्रकल्पाच्या कामावर मोठा परिणाम झाला आहे. दोन महिने काम पूर्णपणे बंद होते. तर आता काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या प्रकल्पातील मजुरही कोरोनाच्या भीतीने आपपल्या गावी परतले. त्यात मे च्या दुसऱ्या आठवड्यात कामाला सुरुवात करण्यास परवानगी मिळाली. त्यानुसार काम सुरू झाले खरे. पण अजूनही कामाने वेग काही घेतलेला नाही.

मे २०२० पर्यंत संपूर्ण काम होणार पूर्ण

मुंबई ते नागपूर हे अंतर पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना बराच वेळ लागतो. त्यामुळेच राज्याची राजधानी आणि राज्याची उपराजधानी एकमेकांना थेट जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला आहे. सुरुवातीला या प्रकल्पाला जोरदार विरोध झाला. पण तरीही एमएसआरडीसीने हा प्रकल्प पुढे नेला. जमीन संपादन असो वा बांधकाम सर्वच काम वेगात सुरू आहे. त्यामुळेच येत्या आठ महिन्यात म्हणजेच 1 मे रोजी 2021 ला या मार्गातील 520 किमीचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. त्यानंतर हा महामार्ग सेवेत दाखल करण्यात येणार आहे. तर 623 किमीचा नागपूर ते इगतपुरी हा टप्पा डिसेंबर 2021 मध्ये पूर्ण होईल.

हेही वाचा-अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : अर्णब गोस्वामींवर दोषारोप पत्र दाखल

Last Updated : Dec 5, 2020, 6:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details