मुंबई -शिवसेनेचे बंडखोर नेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी आज अखेर शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर ( New executive committee of Shiv Sena ) केली याचबरोबर शिवसेनेची जुनी कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय येईल शिंदे गटाच्या ट्रायडेंट येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीनंतर आता शिवसेनेतील कुरबुरी तीव्र झाल्या आहेत. बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी सोमवारी त्यांच्या समर्थक आमदारांची बैठक घेतली, त्यात पक्षाची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी विसर्जित करण्यात आली. यासोबतच शिंदे गटाने नवीन कार्यकारिणीही जाहीर केली. त्यात उद्धव ठाकरे यांच्या जागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे नवे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांची निवड -या बैठकीत शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुखपदाला हात लावलेला नाही. या बैठकीत माजी मंत्री दिपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच पक्षातून नुकतीच हकालपट्टी झालेले रामदास कदम,( Ramdas Kadam ) आनंदराव अडसूळ यांचीही नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
उपनेत्यांचीही निवड -उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
हेही वाचा -Maharashtra Bus Accident : मध्यप्रदेशात एसटी बसचा अपघात, 13 जणांचा मृत्यू; आठ जणांची ओळख पटली