महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Eknath Shinde On Aaditya Thackeray : मुख्यमंत्री शिंदेंचे आदित्य ठाकरेंना पहिल्यांदाच प्रत्युत्तर! - Eknath Shinde On Aditya Thackeray

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांना प्रतिउत्तर दिले. त्यांना जे काय बोलायचे आहे, ते बोलू दे. मात्र, शिवसेना भाजप युतीचे सरकार ( Shiv Sena BJP government ) अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला.

Eknath Shinde On Aditya Thackeray
मुख्यमंत्री शिंदेंचे आदित्य ठाकरेंना पहिल्यांदाच प्रत्युत्तर

By

Published : Jul 21, 2022, 7:39 PM IST

मुंबई -शिवसेनेची गद्दारी करून स्थापन केलेले सरकार अल्पावधीतच कोसळेल असे संकेत आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांनी शिवसंवाद सभेत दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांना प्रतिउत्तर दिले. त्यांना जे काय बोलायचे आहे, ते बोलू दे. मात्र, शिवसेना भाजप युतीचे सरकार ( Shiv Sena BJP government ) अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला.

शिंदे गटाला खासदारांचा पाठिंबा -शिवसेनेतून ४० आमदारांना सोबत घेत, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. शिंदे गटाला आता खासदारांनी पाठिंबा दिला आहे. दिवसागणिक सेनेचे पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. यावरून आदित्य ठाकरे चांगले आक्रमक झाले आहे. युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईत निष्ठा यात्रा काढल्यानंतर आता राज्यभरात शिवसंवाद यात्रेला ( Shiv Samvad Yatra ) सुरुवात केली आहे. भिवंडीपासून औरंगाबादपर्यंत तीन दिवसांचा आदित्य ठाकरेंचा झंजावात सुरू असून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. ठिकठिकाणी आदित्य ठाकरे संवाद साधताना बंडखोर आमदारांचा गद्दार असा उल्लेख करत जोरदार समाचार घेत आहेत. भिवंडीतही झालेल्या सभेदरम्यान बंडखोरांनी राजीनामा द्यावा असा इशारा दिला. मुख्यमंत्री शिंदे आणि यावर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा -Chandrapur Flood : गावाला बेटाचं स्वरूप, 'किराणा नाही, पिण्यासाठी पाणी नाही'; पुराच्या पाण्याने सर्वत्र हाहाकार

कोणाला काय बोलायचं त्याला आता बोलू दे- मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कोणाला काय बोलायचं त्याला आता बोलू दे. आम्ही कायदेशीर, बहुमताचे सरकार बनवले आहे. बाळासाहेबांचे विचार आत्मसात केले असून ते पुढे नेत आहोत. त्यामुळे गेल्या अडीच वर्षापूर्वीचे घडायचं होते, ते आता घडले आहे. आमचे सरकार अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल, शिवाय पुढील काळातही शिवसेना-भाजप युतीचे सरकार येईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना चिमटा काढला. आता आदित्य ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा -Aaditya Thackeray : शिंदेंच्या गडात आदित्य ठाकरेंची गर्जना, 'शिवसेना सोडून गेलेले गद्दारच, बंड करण्यासाठी...'

ABOUT THE AUTHOR

...view details