मुंबई - मागील दोन वर्ष कोविडमुळे सार्वजनिक उत्सव साजरे करताना सतत निर्बंध लादले जात होते. मात्र यंदा भाजपा(BJP) आणि शिवसेनेचे(Shivsena) स्थापन झाल्यापासून निर्बंधमुक्त उत्सव (Unrestricted celebration)जल्लोषात, धुमधडाक्यात आणि जोरात साजरे होत आहेत, अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली. तसेच आगामी काळात ही असेच उत्सव साजरे होतील असे सांगताना लोकांना प्रेमाने जवळ करावे लागते, असा चिमटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना काढला.
नवरात्रोत्सवही धुमधडाक्यात : अनंत चतुर्थीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहिसर येथे भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. मुंबईसह महाराष्ट्रात गणरायाच्या आगमन अतिशय जल्लोषात धुमधडाक्यात झाल्या सरकारने सर्व निर्बंध हटवून टाकले. बिनधास्त, धुमधडाक्याचे गणेशोत्सव साजरा करा, असे आव्हान केले आज दहा दिवस लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. गेल्या दोन वर्षानंतर अतिशय जल्लोषात, धुमधडाक्यात साजरा होताना आपण पाहतोय आहे. याचे समाधान, आनंद आहे. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि मी येणारे सर्व उत्सव जल्लोषात, उत्साहात साजरे व्हावेत, यासाठी गेल्या दोन वर्षात जे नैराश्य, नकारात्मकता पसरली होती ती घालवण्यासाठी सगळेच निर्णय बदलून टाकले. त्यामुळे दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होताना पाहायला मिळतोय. पुढील नवरात्र उत्सवही अशाच पद्धतीने साजरा केला जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
ऊन, पाऊस वारा कशाचा विचार न करता पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करतात. अशातच यंदा निर्बंध मुक्त सण साजरे होत असताना पोलिसांकडून जास्तीचे सहकार्य मागितले आहे. शेवटी आपली परंपरा, संस्कृती पुढे न्यायची आणि वाढवायची आहे. कोविड संकट आणि आर्थिक बंदीमुळे गणेशोत्सव मंडळांना लावलेले निर्बंध मागे घेतले. शिवाय, परवानगीसाठी येणारा खर्च माफ करून एक खिडकी योजना लागू करण्याचे आवाहन केल्याचेही ते म्हणाले.