मुंबई -होम टेस्टिंग किटचा ( Home Testing Kit ) वापर नागरिक मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्याचा वापर करणे गैर नाही. या किटचा वापर केल्यावर जो काही रिपोर्ट येईल, तो वेबसाइटवर अपलोड करणे गरजेचे आहे. तसेच एखाद्याला लक्षणे असतानाही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास रुग्णांनी आरटीपीसीआर चाचणी ( RTPCR Test ) करून घ्यावी. जेणे करून त्या रुग्णांवर योग्य उपचार करणे शक्य होत असल्याची माहिती पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे ( Chief Executive Health Officer Mangala Gomar ) यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.
- होम टेस्टिंग किटचा वापर
मुंबईमध्ये डिसेंबरपासून कोरोनाची तिसरी लाट आली आहे. या लाटेमुळे सर्दी, खोकला, तापाने बहुतेक मुंबईकर हैराण झाले आहेत. सर्दी, खोकला, ताप असताना आरटीपीसीआर चाचणी केल्यास आपण कोरोना पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असल्याने बहुतेक नागरिक चाचणी करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यातच आता घरच्या घरी चाचणी करता येईल, अशा होम टेस्टिंग किट उपलब्ध झाल्या आहेत. याचा वापर करून नागरिक घरच्या घरी टेस्ट करून आपल्याला कोरोना झाला की नाही याची चाचणी करत आहेत. मात्र याचा रिपोर्ट वेबसाईटवर अपलोड करत नसल्याचे समोर आले आहे.
- 'रिपोर्ट वेबसाइटवर अपलोड करा'
याबाबत बोलताना, होम टेस्ट किटचा वापर करणे गैर नाही. ही रॅपिड अँटिजेंन टेस्ट आहे. यामुळे काही मिनिटात आपण पॉझिटीव्ह आहोत का याची माहिती मिळते. यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात ही टेस्ट करत आहेत. या टेस्ट नंतर जो काही रिपोर्ट येईल तो संबंधितांनी वेबसाईटवर अपलोड करणे गरजेचे आहे. हा रिपोर्ट अपलोड न केल्याने एखाद्या रुग्णाला लक्षणे असली तरी त्याची माहिती पालिकेला मिळत नाही. यामुळे संबंधित रुग्णावर वेळीच उपचार होऊ शकत नाही. यामुळे जे नागरिक अशा टेस्ट करत असतील त्यांनी आपला रिपोर्ट वेबसाईटवर अपलोड करावा, असे आवाहन डॉ. गोमारे यांनी केले आहे.
- किटबाबत नियमावली