मुंबई -शहर आणि उपनगरात सध्या आकाशात ढग दाटून आले आहेत. त्यामुळे आज दिवसभर येथे पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. एलबीएस मार्ग, जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्त्यावर व पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी सांयकाळी दोन तास वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे काही भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. मात्र पावसाने काही वेळ शहर व उपनगरात विश्रांती घेतली असल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतूक व्यवस्था काहीशी उशिराने सुरळीत सुरू राहिली. मात्र पावसाचा जोर ठाणे कल्याण बदलापूर परिसरात अधिक राहिल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. बदलापूरमध्ये रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.