मुंबई -गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अनेकांनी उन्हाळयात घरीच सुट्या साजऱ्या केल्या. मात्र,आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यात निर्बंध हटविण्यात आले आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टी साजऱ्या करण्यासाठी आणि लग्न सराईचा सीजन आहे. यामुळे बाहेर गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने रेल्वेकडून गर्दीचे विभाजन करण्यासाठी मध्य रेल्वेने एप्रिल ते जून २०२२ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/लोकमान्य टिळक टर्मिनस/पनवेल/पुणे/नागपूर आणि साईनगर शिर्डी येथून विविध ठिकाणी ५७४ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.
खुशखबर! उन्हाळी सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेकडून ५७४ उन्हाळी विशेष ट्रेन - mumbai central railways latest news
अशा आहेत उन्हाळी विशेष ट्रेन - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मनमाड/ नागपूर/ मालदा टाउन/ रीवा दरम्यान १२६ उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.- दादर आणि मडगाव दरम्यान ६ उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.- लोकमान्य टिळक टर्मिनस आणि शालिमार/ बलिया/ गोरखपूर/ समस्तीपूर/ थिवि दरम्यान २८२ उन्हाळी विशेष ट्रेन आहेत. या ५७४ उन्हाळी विशेष ट्रेनचे विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे.
अशा आहेत उन्हाळी विशेष ट्रेन -
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मनमाड/ नागपूर/ मालदा टाउन/ रीवा दरम्यान १२६ उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.
- दादर आणि मडगाव दरम्यान ६ उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.
- लोकमान्य टिळक टर्मिनस आणि शालिमार/ बलिया/ गोरखपूर/ समस्तीपूर/ थिवि दरम्यान २८२ उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.
- पनवेल आणि करमळी दरम्यान १८ उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.
- नागपूर आणि मडगाव दरम्यान २० उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.
- पुणे आणि करमळी/ जयपूर/ दानापूर/ वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन/ कानपूर सेंट्रल दरम्यान १०० उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.
- साईनगर शिर्डी आणि ढेहर का बालाजी दरम्यान २० उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.
- लातूर आणि बिदर दरम्यान २ उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.
आरक्षण सुरू - या ५७४ उन्हाळी विशेष ट्रेनचे विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे.