मुंबई-गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खूशखबर आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची तुफान गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने 72 गणपती स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी काही प्रमाणात सोय होणार आहेत. या गणपती स्पेशल ट्रेन सीएसएमटी ते सावंतवाडी, सीएसएमटी -रत्नागिरी, पनवेल-सावंतवाडी आणि पनवेल -रत्नागिरी दरम्यान या स्पेशल गाड्या चालविण्यात येणार आहेत. ८ जुलैपासून प्रवासी या गणपती स्पेशल ट्रेनचे आरक्षण करू शकणार आहेत.
सीएसएमटी-सावंतवाडी राेड स्पेशल ट्रेन-
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी-सावंतवाडी राेड स्पेशल ट्रेनच्या ३६ फेऱ्या हाेणार आहेत. ०१२२७ सीएसएमटी-सावंतवाडी ट्रेन ५ ते २२ सप्टेंबर दरम्यान दरराेज रात्री १२.२० वाजता सुटून दुपारी २ वाजता सावंतवाडीला पाेहाेचणार आहे. तर परतीकरिता ०१२२८ ट्रेन दरराेज दुपारी २.४० वाजता निघून सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ वाजता येईल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, राेहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, सावर्डे, अरवली राेड, संगमेश्वर राेड, रत्नागिरी, अडवली, वलिवडे, राजापुर राेड, वैभववाडी, कणकवली, नांदगाव, सिंधुदुर्ग आणि कुडाळा स्थानकात थांबा दिला आहे.
सीएसएमटी -रत्नागिरी स्पेशल ट्रेन -
सीएसएमटी -रत्नागिरी स्पेशल ट्रेनच्या दहा फेऱ्या हाेणार असून आठवड्यातून ही गाडी दाेन वेळा धावणार आहे. ०१२२९ सीएसएमटी-रत्नागिरी स्पेशल ट्रेन ६ ते २० सप्टेंंबर दरम्यान दर साेमवारी आणि शुक्रवारी दुपारी १.१० वाजता सुटून रत्नागिरीला त्याच दिवशी रात्री १०.३५ वाजता येईल. परतीकरिता ०१२३० ट्रेन ९ ते २३ सप्टेंबर दरम्यान दर रविवार आणि गुरुवारी रात्री ११.३० वाजता निघून सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी सकाळी ८.२० वाजता येईल.यागाडीला दादर, ठाणे, पनवेल, राेहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, सावर्डे, अरवली राेड, संगमेश्वर राेड स्थानकात थांबा दिला आहे.
पनवेल-सावंतवाडी राेड स्पेशल ट्रेन-
पनवेल-सावंतवाडी राेड स्पेशल ट्रेन आठवड्यातून तीन वेळा धावणार असून गाडीच्या १६ फेऱ्या हाेणार आहेत. ०१२३१ पनवेल-सावंतवाडी ट्रेन ७ ते २२ सप्टेंबर दरम्यान दर मंगळवार, बुधवार आणि शनिवारी सकाळी ८ वाजता सुटून रात्री ८ वाजता सावंतवाडीला पाेहाेचणार आहे. तर परतीकरिता ०१२३२ ट्रेन त्याच दिवशी रात्री ८.४५ वाजता निघून पनवेलला दुसऱ्या दिवशी सकाळी ७.१० वाजता येईल. या गाडीला राेहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, सावर्डे, अरवली राेड, संगमेश्वर राेड, रत्नागिरी, अडवली, वलिवडे, राजापुर राेड, वैभववाडी, कणकवली, नांदगाव, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकात थांबा दिला आहे.
पनवेल -रत्नागिरी स्पेशल ट्रेन-
पनवेल -रत्नागिरी स्पेशल ट्रेनच्या दहा फेऱ्या हाेणार आहेत. ०१२३३ पनवेल-रत्नागिरी स्पेशल ट्रेन ९ ते २३ सप्टेंंबर दरम्यान दर गुरुवार आणि रविवारी सकाळी ८ वाजता सुटून रत्नागिरीला त्याच दिवशी दुपारी ३.४० वाजता पाेहचेल. परतीकरिता ०१२३४ ट्रेन दर साेमवार आणि शुक्रवारी रात्री ११.३० वाजता निघून सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता येईल. यागाडीला राेहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, सावर्डे, अरवली राेड, संगमेश्वर राेड स्थानकात थांबा दिला आहे. या गाड्यांना एसी थ्री टायर कम एसी टु टायरचा एक काेच, एसी थ्री टायरचे चार, स्लीपर क्लासचे ११ तर सेकण्ड सीटिंंग क्लासचे सहा काेच असतील.
हेही वाचा -ठाण्यातील इलेक्ट्रॉनिक मार्केटला लागलेली आग नियंत्रणात