महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना इफेक्ट; मध्य रेल्वेने माल गाड्यांतून 1530 टन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक - मध्य रेल्वे

कोरोना संसर्गामुळे देशभरात संटारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील प्रवासी रेल्वेसेवा बंद करण्यात आली, मात्र जीवनावश्यक मालाची वाहतूक करण्यात येत आहे.

Railway
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Apr 15, 2020, 7:54 PM IST

मुंबई- मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण, नागपूर, भुसावळ, सोलापूर, पुणे, नाशिक येथून जीवनावश्यक वस्तूंची विविध ठिकाणी वाहतूक केली. मध्य रेल्वेने आतापर्यंत 1530 टन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली.

जीवनावश्यक वस्तूंमध्ये औषधे, वैद्यकीय उपकरणे, फळे, भाज्या, अंडी, ज्युट बियाणे, टपाल बॅग्स आणि कच्चा माल यांचा समावेश आहे. गुवाहाटी, नागपूर, वाडी, सोलापूर येथे औषधे व वैद्यकीय उपकरणे पाठवण्यात आले.


बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, टाटानगर, गुवाहाटी, कोलकाता येथे फळे, भाज्या व किराणा माल पाठवण्यात आला आहे. तर चेन्नई, भागलपूर, कोलकाता, भुसावळ, नाशिक आणि नागपूर येथे पोस्टल बॅग्स, ज्यूट बियाणे, पार्सल बॅग्स पाठविण्यात आले आहेत.

पाथरी, पोरबंदर, नवी दिल्ली, कोलकाता, हैदराबाद येथून मध्य रेल्वेतील नागपूर, पुणे, नाशिक, अकोला, नागपूर, कलबुरगी, मनमाड, भुसावळ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकांवर औषधे, पोस्टल बॅग, भाजीपाला, खाद्यपदार्थ, दुधाची उत्पादने, पतंजली उत्पादने आणि हार्ड पार्सल यांची आवक झाल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details