महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Summer Special Train : मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा! उन्हाळ्यात धावणार ६२६ विशेष ट्रेन - उन्हाळी विशेष ट्रेन ची यादी

उन्हाळ्याच्या सुट्टी ( Summer Holiday ) साजऱ्या करण्यासाठी आणि लग्न सराईचा सीजन असल्यामुळे बाहेर गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वेकडून दर वर्षी उन्हाळी विशेष ट्रेन ( Summer Special Train ) चालविल्या जातात. यंदा सुद्धा प्रवाशांचा सुविधेसाठी मध्य रेल्वेने आपल्या विद्यमान गाड्यांव्यतिरिक्त ६२६ विशेष ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली आहे.

Summer Special Train
मध्य रेल्वे

By

Published : May 10, 2022, 5:53 PM IST

मुंबई -उन्हाळ्याच्या सुट्टी ( Summer Holiday ) साजऱ्या करण्यासाठी आणि लग्न सराईचा सीजन असल्यामुळे बाहेर गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वेकडून दर वर्षी उन्हाळी विशेष ट्रेन ( Summer Special Train ) चालविल्या जातात. यंदा सुद्धा प्रवाशांचा सुविधेसाठी मध्य रेल्वेने आपल्या विद्यमान गाड्यांव्यतिरिक्त ६२६ विशेष ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली ( summer special train list news ) आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यंदा सर्वाधिक गाड्या मध्य रेल्वेवर -मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे कायमच आपल्या प्रवाशांना चांगल्या आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित दिशेने देण्यास वचनबद्ध आहे. विशेषतः उन्हाळ्यातील हंगामात प्रवाशांची सतत वाढती मागणी वाढत आहे. हे लक्षात घेता मध्य रेल्वेने वर्ष २०२२ मध्ये आपल्या विद्यमान गाड्यांव्यतिरिक्त ६२६ उन्हाळ्यातील विशेष ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली आहे. २०२१ आणि २०१९ मध्ये, उन्हाळ्यातील विशेष ट्रेनची संख्या अनुक्रमे ४३५ आणि ५४० होती. तर २०२० मध्ये कोविड साथीच्या कारणाने उन्हाळ्यात विशेष ट्रेन चालविण्यात आल्या नाहीत. एप्रिल ते जून २०२२ मध्ये या ६२६ उन्हाळी विशेष ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई / दादर / लोकमान्य टिळक टर्मिनस / पनवेल / पुणे / नागपूर / साईनगर शिर्डी सारख्या मध्य रेल्वेतील स्टेशन पासून विविध गंतव्यस्थानाकरीता चालविण्यात येत आहेत.

अशी आहे संख्या -

  • लोकमान्य टिळक टर्मिनस आणि शालिमार, बलिया, गोरखपूर, मऊ, समस्तीपूर, बनारस तसेच थिवि दरम्यान ३०६ उन्हाळ्यातील विशेष ट्रेन.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मनमाड, नागपूर, मालदा टाऊन तसेच रिवा दरम्यान उन्हाळ्यातील २१८ विशेष ट्रेन.
  • पुणे आणि करमळी, जयपूर दानापूर, वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन तसेच कानपूर सेंट्रल दरम्यान उन्हाळ्यात १०० विशेष ट्रेन.
  • नागपूर आणि मडगाव दरम्यान उन्हाळ्यातील २० विशेष ट्रेन.
  • साईनगर शिर्डी आणि ढहर का बालाजी दरम्यान उन्हाळ्यातील २० विशेष ट्रेन.
  • पनवेल आणि करमळी दरम्यान उन्हाळ्यातील १८ विशेष ट्रेन.
  • दादर आणि मडगाव दरम्यान उन्हाळ्यातील ६ विशेष ट्रेन.
  • लातूर आणि बिदर दरम्यान उन्हाळ्यातील २ विशेष ट्रेन.

हेही वाचा -MNS Leader Vasant More : ...तोपर्यंत पक्ष कार्यालयात जाणार नाही; वसंत मोरे यांचा निर्धार

ABOUT THE AUTHOR

...view details