मुंबई -मध्य रेल्वे नेहमीच नावीण्यपुर्ण उपक्रम राबवित असते. मध्य रेल्वेने २०२१-२२ या आर्थिक वर्षात आपल्या विभागातील ४४३ कोटी ३५ लाख रुपयांचे भंगार विकले ( Central Railway scrap sales ) आहे. शुन्य भंगार मोहिमेअंतर्गत मध्य रेल्वेनेहे काम केले आहे. याशिवाय कोविड-१९ महामारी असूनही मध्य रेल्वेने २०२०-२१ या वर्षात ३५० कोटी रुपयांचे भंगार (स्क्रॅप) विक्रीचे लक्ष्य ओलांडले आहे आणि ३९१.४३ कोटी रुपयांचे स्क्रॅप विकले आहे, जे गेल्या १५ वर्षातील सर्वाधिक आहे.
३१.६५% ने वाढले उत्पन्न -
मध्य रेल्वेमधील प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी मध्य रेल्वेने "झिरो स्क्रॅप मिशन" ( Zero scrap mission ) सुरू केले आहे. कोविड-१९ महामारी असूनही मध्य रेल्वेने २०२०-२१ या वर्षात ३५० कोटी रुपयांचे स्क्रॅप विक्रीचे लक्ष्य ओलांडले आहे आणि ३९१ कोटी ४३ लाख रुपयांचे स्क्रॅप विकले आहे, जे गेल्या १५ वर्षातील सर्वाधिक आहे. तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात फेब्रुवारी-२०२२ पर्यंत भंगारातून ४४३ कोटी ३५ लाख उत्पन्नाची नोंद केली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील उत्पन्नापेक्षा हे १०६ कोटी ५७ लाख अधिक आहे जे ३१.६५% ने वाढले आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीतील उत्पन्न ३३६ कोटी ७८ लाख इतके होते. या स्क्रॅप मटेरियलमध्ये स्क्रॅप रूळ, पर्मनंट-वे साहित्य, निरूपयोगी (भंगार) डबे, वॅगन आणि इंजीन (लोकोमोटिव्ह) इत्यादींचा समावेश आहे.