महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

फर्स्ट क्लास व दिव्यांगांच्या डब्यात अनियमित प्रवाशांकडून मध्य रेल्वेने केला लाखो रुपयाचा दंड वसूल - News about Central Railway fine collection

मध्य रेल्वेच्या फर्स्ट क्लास व दिव्यांगाच्या डब्यातून अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडन मध्य रेल्वेने दंड वसूल केला आहे. ही कारवाई नोव्हेंबर २०१९ मध्ये करण्यात आली.

central-railway-collects-fine-for-irregular-passengers-in-first-class-and-handicapped-coaches
फर्स्ट क्लास व दिव्यांगांच्या डब्यात अनियमित प्रवाशांकडून मरेने केला

By

Published : Dec 17, 2019, 9:27 PM IST

मुंबई - मध्य रेल्वेच्या फर्स्ट क्लास व दिव्यांगांच्या डब्यातून अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मध्य रेल्वेने लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. दिव्यांग व फर्स्ट क्लासमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने मोहीम हाती घेतली त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा -रुग्णवाहिका नसल्याने तडफडणाऱ्या जखमीला नेले लोकलमधून

रेल्वे सुरक्षा बल आणि तिकीट तपासनीस यांनी दिव्यांगांच्या डब्यात 2076 व्यक्तींवर कारवाई केली. नोव्हेंबर 2019 मध्ये 941 जणांवर करण्यात आलेल्या कारवाईत 4,98,200 रुपये दंड वसूल करण्यात आला.

हेही वाचा -मध्य रेल्वेवरील पहिली एसी लोकल चालवण्याचा मान महिला मोटरमनला; लवकरच येणार रुळावर

जानेवारी ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत मध्य रेल्वेच्या पहिला श्रेणीच्या डब्यात 31,031 अनियमित व्यक्तीविरोधात केलेल्या कारवाईत 1.156 कोटी रुपये दंड मध्य रेल्वेने वसूल केला.

ABOUT THE AUTHOR

...view details