महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 19, 2020, 8:12 PM IST

Updated : Mar 19, 2020, 8:51 PM IST

ETV Bharat / city

कोरोना प्रभाव : मध्य रेल्वेने केल्या 23 गाड्या रद्द

या कारणाने मध्य रेल्वेकडून काही गाड्या रद्द करण्‍याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात वातानुकूलित उपनगरीय सेवेतील मुंबई विभागाच्‍या ट्रान्‍स हार्बर मार्गावर चालणाऱ्या 16 वातानुकूलित उपनगरीय सेवा देणाऱ्या गाड्या 20 मार्च पासून 31 मार्चपर्यंत रद्द राहतील.

कोरोना प्रभाव
कोरोना प्रभाव

मुंबई - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केल्यानंतर मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. या कारणाने मध्य रेल्वेकडून काही गाड्या रद्द करण्‍याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात वातानुकूलित उपनगरीय सेवेतील मुंबई विभागाच्‍या ट्रान्‍स हार्बर मार्गावर चालणाऱ्या 16 वातानुकूलित उपनगरीय सेवा देणाऱ्या गाड्या 20 मार्च पासून 31 मार्चपर्यंत रद्द राहतील. या मध्ये-

कोरोना प्रभाव : मध्य रेल्वेने केल्या 23 गाड्या रद्द


मेल/एक्‍सप्रेस गाड्या

अ. क्र. गाडी क्रमांक गाडीचे नाव गाडी रद्द केल्याचा कालावधी
1) 11011 लोकमान्‍य टिळक टर्मिनस-नांदेड एक्सप्रेस 25.03.2020 रोजी रद्द
2) 11012 नांदेड- लोकमान्‍य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 26.03.2020 रोजी रद्द
3) 11025/11026 पुणे-भुसावळ-पुणे एक्सप्रेस 20.3.2020 ते 31.03.2020 पर्यंत रद्द
4) 11047/11048 मिरज-हुबळी-मिरज एक्सप्रेस 20.3.2020 ते 31.03.2020 पर्यंत रद्द
5) 11075 लोकमान्‍य टिळक टर्मिनस -बिदर एक्सप्रेस 24.3.2020 ते 31.3.2020 पर्यंत रद्द
6) 11076 बिदर- लोकमान्‍य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 25.3.2020 सह 01.04.2020 पर्यंत रद्द
7) 11083 लोकमान्‍य टिळक टर्मिनस -काझिपेट ताडोबा एक्सप्रेस 20.3.2020 सह 27.3.2020 पर्यंत रद्द
8) 11084 काझीपेट- लोकमान्‍य टिळक टर्मिनस ताडोबा एक्सप्रेस 21.03.2020 सह 28.03.2020 पर्यंत रद्द
9) 11085 लोकमान्‍य टिळक टर्मिनस -मडगाव डबल डेकर एक्सप्रेस 23, 26 सह 30 मार्च 2020 पर्यंत रद्द
10) 11086 मडगाव- लोकमान्‍य टिळक टर्मिनस डबल डेकर एक्सप्रेस 24, 27 सह 31मार्च 2020
पर्यंत रद्द
11) 11304 कोल्हापूर-मनुगुरू एक्सप्रेस 20.3.2020 ते 31.3.2020 पर्यंत रद्द
12) 11303 मुणुगरू-कोल्हापूर एक्सप्रेस
21.3.2020 ते 01.04.2020 पर्यंत
13) 11416 कोल्हापूर-बिदर एक्सप्रेस 25.03.2020 रोजी रद्द
14) 11415 बिदर-कोल्हापूर एक्सप्रेस 26.03.2020 रोजी रद्द
15) 12025/12026 पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्सप्रेस 20.3.2020 ते 31.03.2020 पर्यंत रद्द
16) 12025/12026 पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्सप्रेस 20.3.2020 ते 31.03.2020 पर्यंत रद्द
17) 12157/12158 पुणे-सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेस 20.3.2020 ते 31.03.2020 पर्यंत रद्द
18) 12169/12170 पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस 20.3.2020 ते 31.03.2020 पर्यंत
19) 12223 लोकमान्‍य टिळक टर्मिनस -एर्नाकुलम द्विसाप्‍ताहिक दुरंतो एक्सप्रेस 21.03.2020 ते 31.03.2020 पर्यंत रद्द
20) 12224 एर्नाकुलम- लोकमान्‍य टिळक टर्मिनस दुरंतो द्विसाप्‍ताहिक एक्सप्रेस 22.03.2020 ते 01.04.2020 पर्यंत रद्द
21) 22133 सोलापूर-कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस 20.3.2020 ते 31.03.2020 पर्यंत रद्द
22) 22134 कोल्हापूर-सोलापूर सुपरफास्ट एक्सप्रेस 21.3.2020 ते 01.04.2020 पर्यंत रद्द
23) 22155 /22156 सोलापूर-मिरज-सोलापूर सुपरफास्ट एक्सप्रेस 20.3.2020 ते 31.03.2020 पर्यंत रद्द
Last Updated : Mar 19, 2020, 8:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details