मुंबई- महाराष्ट्र व मुंबईतून मोठ्या संख्येने स्थलांतरित कामगार आपल्या राज्यात परतत आहेत. मात्र, त्यांना परत जाण्यासाठी आवश्यक ट्रेन मिळत नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियावरून संवाद साधताना म्हटले होते. अखेर उशिरा का होईना, त्याची दखल घेत स्थलांतरित मजुरांसाठी महाराष्ट्रला 125 श्रमिक स्पेशल रेल्वे देण्याची तयारी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरच्या माध्यमातून दाखवली आहे.
तर महाराष्ट्रातून 125 विशेष श्रमिक रेल्वे चालवण्याची तयारी, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची ट्विटरवरून माहिती - रेल्वे मंत्री पियुष गोयल
मुंबईतून मोठ्या संख्येने स्थलांतरित कामगार आपल्या राज्यात परतत आहेत. मात्र, त्यांना परत जाण्यासाठी आवश्यक ट्रेन मिळत नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियावरुन संवाद साधताना म्हटले होते. त्यावर महाराष्ट्रात आणखी श्रमीक रेल्वे महाराष्ट्रातून सोडण्यात येतील असे ट्विट रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केले आहे.
पियुष गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठीही शुभेच्छा दिल्यात. श्रमिक ट्रेन कुठून सुटणार, प्रवाशांची माहिती, त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि ट्रेन कोणत्या राज्यात जाणार, याची संपूर्ण माहिती मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पुढील एका तासात पाठविण्यात यावी. जेणेकरून ट्रेनची व्यवस्था करता येईल, असे गोयल यांनी ट्विट केले आहे. तसेच ट्रेन स्थानकात आल्यावर ती खाली जाऊ नये, जेवढ्या ट्रेन हव्या असतील, तेवढ्या उपलब्ध केल्या जातील, असा उपरोधक टोलाही गोयल यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.