महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शिवसैनिकांचा जल्लोष; केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचे मुंबईत जंगी स्वागत - मंत्री

केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्यानंतर अरविंद सावंत यांचे मुंबईत पहिल्यांदा आगमन झाले. यावेळी शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

अरविंद सावंत यांचा स्वागत सोहळा

By

Published : Jun 1, 2019, 5:40 PM IST

मुंबई- दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली. मंत्री झाल्यानंतर त्यांचे आज मुंबईत आगमन झाले. मुंबई विमानतळावर शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

अरविंद सावंत यांचा स्वागत सोहळा


शिवसेनेचे 18 खासदार निवडून लोकसभेत गेले आहेत. गुरुवारी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज ते मुंबईत दाखल झाले. मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांचा पराभव करून सावंत दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. सुरवातीपासून सावंत यांचे नाव मंत्रीपदाच्या शर्यतीत होते. यावेळी विमानतळावर शिवसैनिकांनी ढोल-ताशा वाजवून जल्लोष केला.

ABOUT THE AUTHOR

...view details