महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis : मुख्यमंत्रीपद हिसकावल्यानंतर फडणवीसांवर केंद्राचा 'वॉच'; मर्जीतील अधिकाऱ्याकडे सोपवला कारभार - केंद्र सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या कामावर नजर

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडवणीस यांची वर्णी लागली. त्यानंतरही केंद्रातून फडवणीस यांच्यावर वॉच ठेवण्यात येणार ( Central Government Watch DCM Devendra Fadnavis Work ) आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

By

Published : Jul 15, 2022, 4:14 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकार विरोधात निर्णय घेतले होते. मात्र, आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केले. त्यानंतर केंद्र सरकारकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभावर देखरेख ठेवण्यात येणार आहे. यासाठी मर्जीतील अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली ( Central Government Watch DCM Devendra Fadnavis Work ) आहे.

...अन् अमित शहांना बॅनरवरुन हटवले - राज्यात भाजप आणि शिंदे गटाने सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री घोषित केले. तसेच, मंत्रिमंडळात मी असणार नाही, असे स्पष्ट केले. काही वेळातच केंद्रातून चक्रे फिरली आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करण्याचे निर्देश देण्यात आले. पक्षादेश मानत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यामुळे भाजपमध्ये मोठ्या असंतोष निर्माण झाला. अनेकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फडणवीसांच्या शुभेच्छा बॅनरवरून हटवले. आरएसएसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरपर्यंत याचे पडसाद उमटले होते. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये जाऊन राजकीय सत्तासंघर्षाचा उलगडा केला.

दिल्लीतून वॉच - एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी केंद्राकडे गळ घातली, अशी कबुली उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर सभेत दिली. मात्र, फडणवीस यांना डावलण्यामागे केंद्र सरकारचा विशेषतः जे. पी. नड्डा आणि अमित शहा यांचा हात असल्याचे बोलले जाते. महाराष्ट्रात फडणवीस यांची राजकीय ताकद दिवसागणिक वाढत आहे. हे वाढते प्राबल्य केंद्रासाठी डोकेदुखी ठरू शकते. फडणवीस यांचे राजकीय पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यातच आता फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री विभागात दिल्लीतून अधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

श्रीकर परदेशीं पाठोपाठ आणखी एक अधिकारी दिल्लीतून येणार - देवेंद्र फडणवीस यांची राज्यात उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर या खात्यावर केंद्र सरकारने बारीक नजर ठेवण्याचे काम सुरू केले आहे. केंद्रात पंतप्रधान कार्यालय आणि नरेंद्र मोदी यांच्या जवळचे अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांची फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री खात्यात सचिव या पदावर निवड केली आहे. लवकरच काही अधिकारी केंद्रातून राज्यात पाठवले जाणार आहेत. फडणवीस मुख्यमंत्री असताना गृहखाते स्वतः कडे ठेवले होते. आताही गृहमंत्री पदासाठी फडणवीस आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे मंत्री अमित शहा यांच्या केंद्रीय गृह खात्यातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याला राज्यात पाठवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा -Naresh Maske : मुख्यमंत्री शिंदेंकडून नरेश मस्के यांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी पुनश्च नियुक्ती; म्हणाले, 'हकालपट्टी हे शब्द...'

ABOUT THE AUTHOR

...view details