मुंबई - ओबीसी जातीच्या जनगणनेला केंद्र सरकारने विरोध केल्याने विधानसभेत गदारोळ झाला होता. असे असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मात्र, जातीनिहाय जनगणनेच्या पक्षात मत व्यक्त केले आहे.
केवळ इतर मागास वर्गीय अर्थात ओबीसी नाही, तर सर्वच जातींची जनगणना झाली पाहिजे, असे आठवले यांनी म्हटले आहे. विधानभवन पत्रकार कक्षात रामदास आठवले बोलत होते.
हेही वाचा...निष्ठेला सलाम ! आठ महिन्याच्या गर्भवती असूनही नमिता मुंदडा मतदार संघाच्या प्रश्नांसाठी विधानसभेत
ओबीसीची जनगणना केल्यास जातीवादाला खतपाणी मिळेल, अशी भीती बाळगण्याची कोणतीही गरज नाही. जातीची जनगणना झाल्यास त्या संबंधित जातीसाठी आवश्यक त्या उपयाययोजना करणे अधिक सोपे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारे जातनिहाय जनगणना व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.