मुंबई - अभिनेत्री पायल घोष हिने चित्रपट निर्माते अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक छळाचा आरोप केल्यावर चित्रपटसृष्टीतील मित्रांनी अनुराग कश्यपचीबाजू घेतली आहे. अनुभव सिन्हा, टिस्का चोप्रा आणि सुरवीन चावला हे कश्यप यांच्या समर्थनार्थ समोर आले आहेत.
अभिनेत्री पायल घोषने शनिवारीट्विटरवरून गॅंग्स ऑफ वासेपूर या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने लैंगिक छळ केला होते, असा आरोप केला होता. कश्यप याने हा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. 30 वर्षीय पायल घोषने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आपले ट्विट टॅग केले आणि चित्रपट निर्मात्यावर कारवाई करण्याची विनंती केली.
यानंतर अनुभव सिन्हा यांनी #MeToo चळवळीचे अस्तित्व छळ झालेल्या महिलांवरील अन्यायाला वाचा फोडणे हे आहे, त्याचा गैरवापर होऊ नये, असे म्हटले आहे. सुरवीन चावलाने चित्रपट निर्माता कश्यप याच्याबरोबर त्यांच्या सेक्रेड गेम्सच्या दोन भागांच्या नेटफ्लिक्स मालिकेत काम केले होते. तिने या दिग्दर्शकाविरोधातील आरोप हा संधीसाधूपणा असल्याचे म्हटले आहे. ‘छूरी’ या लघुपटामध्ये कश्यप आणि चावला यांच्यासोबत असलेल्या टिस्का चोप्रानेही कश्यपची बाजू घेतली आहे. चित्रपट निर्माता कश्यप हे पुरुष किंवा महिलेतील प्रतिभेला वाव देणारे आहेत, असे म्हटले आहे.
कश्यपने रविवारी हिंदीमध्ये अनेक ट्विट्स करत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. 'माझ्यावरती आरोप करण्यासाठी इतका वेळ घालवला. हरकत नाही. माझ्यावर आरोप करताना तुम्हीही खोटे बोलत आहात. तुम्ही इतर महिलांनाही यात ओढले. तुमचे सर्व आरोप निराधार आहेत, एवढेच मी म्हणेन,' असे ट्विट कश्यपने केले आहे.
पायल घोषला राष्ट्रीय महिला आयोगाचा पाठिंबा मिळाला आहे. एनएसडब्लूच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी आयोग या बाबीची दखल घेईल, असे आश्वासन या अभिनेत्रीला दिले आहे.