महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करा : नवी मुंबई पोलीस आयुक्तांचे आवाहन - Bipin Kumar singh on Diwali cracker

गणेशोत्सवानंतर अचानक कोरोना रुग्णांत वाढ झाली होती. त्यामुळे दिवाळीत ती परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी गर्दी करू नका तसेच दिवाळीच्यावेळी वाजवल्या जाणाऱ्या फटक्यांमुळे झालेल्या प्रदूषणाचा परिणाम कोरोना रुग्णांवर होऊ शकतो. त्यामुळे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग
पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग

By

Published : Nov 7, 2020, 9:53 AM IST

मुंबई - राज्यात कोविड 19 चा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र दिवाळीच्या सणानिमित्त होणाऱ्या खरेदीसाठी गर्दीमुळे पुन्हा एकदा चिंतेत वाढ झाली आहे. गणेशोत्सवानंतर अचानक कोरोना रुग्णांत वाढ झाली होती. त्यामुळे दिवाळीत ती परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून नवीमुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी गर्दी करू नका तसेच दिवाळीच्यावेळी वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे झालेल्या प्रदूषणाचा परिणाम कोरोनाचा रुग्णांवर होऊ शकतो. त्यामुळे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

अन्यथा कारवाई करू...

संपूर्ण शहर अजूनही कोरोना महामारीचा सामना करीत आहे. अशातच दिवाळीच्या सणात फटाके फोडण्यामुळे प्रदूषण वाढून त्याचा त्रास कोरोनाच्या रुग्णांना होऊ शकतो. त्यांच्या फुफ्फुसावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दिवाळीला फटाके न फोडण्याचे तसेच फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन, आयुक्तांनी केले. नागरिकांनी या आवाहनाचे पालन केले नाही तर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कारवाई करण्यात येईल, असेही सिंग म्हणाले. आता या आवाहनाला नवी मुंबईतील नागरिक किती गंभीरपणे प्रतिसाद देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details