मुंबई :शिवसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे ( Thane District President Kedar Dighe ) यांच्या विरोधात एन. एम. जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये ( N M Joshi Marg Police Station ) बलात्कार पीडित ( Rape Victim ) महिलेला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार शिंदे यांचे मित्र रोहित कपूरने ( Accused Rohit Kapoor ) सेंट रेजीस या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका कर्मचारी युवतीवर बलात्कार झाल्याची तक्रार एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात ( N M Joshi Marg Police Station ) मंगळवारी नोंदवण्यात आली होती. या हाॅटेलचे सीसीटीव्ही आता समोर ( CCTV Now in Front ) आले आहे. 1 ऑगस्ट 2022 चे हे सीसीटीव्ही आहेत. ज्यात रोहित कपूर आणि केदार दिघे दोघेही एकत्र दिसत आहे.
रोहित कपूरने बलात्कार केल्याचा दावा : रोहीत कपूर या बड्या व्यावसायिकाने हे घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप पीडित युवतीने केला आहे. तर पैसे घे आणि याची वाच्यता करू नकोस, नाहीतर तुला संपवू, अशी धमकी केदार दिघे यांनी दिल्याची तक्रारससुद्धा या पीडित युवतीने केली आहे. त्यानंतर आता या प्रकरणाचा हॉटेलमध्ये सीसीटीव्हीत दोघेही दिसत असल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. केदार दिघे यांचे या घटनेशी कनेक्शन समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.
केदार दिघे यांच्या राजकीय प्रतिमेला धक्का पोहचण्याची शक्यता :केदार दिघे हे ठाणे जिल्हा तत्कालीन शिवसेना प्रमुख कै. आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. आनंद दिघे साहेब गेल्यानंतर ते ठाणे आणि पालघर ग्रामीण भागामध्ये शिवसेनेअंतर्गत असणाऱ्या युवासेनात कार्यरत होते. शिवसेनेच्या बहुतांशी कार्यक्रमात त्यांना बोलावले जात नव्हते. ठाण्यातील शिवसेनेचे काही नेते त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवत होते हे लक्षात आल्याने चार वर्षांपूर्वी त्यांनी युवासेनेचा राजीनामा दिला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी करताच केदार दिघे राजकारणात सक्रिय झाले. ते शिवसेना भवनात वेळोवेळी दिसू लागले. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी काढलेल्या शिवसंवाद यात्रेत केदार दिघे आपल्या समर्थकांसह सहभागी झाले होते.