मुंबई- माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने अनिल देशमुख, परमबीर सिंग व इतर व्यक्तींची चौकशी केली. त्या चौकशीचा अहवाल सीबीआयच्या विशेष न्यायालयामध्ये सादर करण्यात आला आहे.
सीबीआयकडून चौकशीचा अहवाल विशेष न्यायालयात सादर - parmbir singh
काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयकडून गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. अनिल देशमुख यांच्याशी संबंधित काही ठिकाणी छापेमारी देखील करण्यात आले होती. नागपुरमधील अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावर सीबीआयकडून त्यांची तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयकडून गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. अनिल देशमुख यांच्याशी संबंधित काही ठिकाणी छापेमारी देखील करण्यात आले होती. नागपुरमधील अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावर सीबीआयकडून त्यांची तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणी अनिल देशमुख यांच्यासह 5 जणांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केलेला आहे. सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्या मुंबई व नागपूरमधील घर तसेच कार्यालयावर छापेमारी करण्यात आल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित वेगवेगळ्या व्यक्तींची चौकशी करण्यात आलेली आहे. या व्यक्तींमध्ये अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक, पीएस तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केलेल्या गुन्हे शाखेचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी करण्यात आली. प्रकरणातील तक्रारदार अॅड. जयश्री पाटील, आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांचादेखील जबाब नोंदवण्यात आला.