महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sheena Bora Murder Case : शीना बोरा जिवंत असलेल्या पत्र म्हणजे खटल्याच्या विलंबासाठी, सीबीआयचे पत्राद्वारे उत्तर

शीना बोरा हत्याकांडातील ( Sheena Bora Murder Case ) मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने ( Indrani Mukherje ) 24 जानेवारीला मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला होता. शीना बोरा जम्मू-काश्मीरमध्ये जिवंत असल्याचा दावा अर्जामध्ये करण्यात आला होता. यावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश सीबीआयला दिले होते. सीबीआयने आपल्या उत्तरात म्हटले आहे की खटल्याच्या सुनावणीला विलंब करण्याच्या उद्देशाने हा अर्ज दाखल करण्यात आला आहे.

Sheena Bora Murder Case
Sheena Bora Murder Case

By

Published : Mar 3, 2022, 10:26 PM IST

मुंबई -शीना बोरा हत्याकांडातील ( Sheena Bora Murder Case ) मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने ( Indrani Mukherje ) 24 जानेवारीला मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला होता. शीना बोरा जम्मू-काश्मीरमध्ये जिवंत असल्याचा दावा अर्जामध्ये करण्यात आला होता. यावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश सीबीआयला दिले होते. सीबीआयने आपल्या उत्तरात म्हटले आहे की खटल्याच्या सुनावणीला विलंब करण्याच्या उद्देशाने हा अर्ज दाखल करण्यात आला आहे.

इंद्राणी मुखर्जीकडून न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी आणि खटला निकाली काढण्यास विलंब करण्यासाठी हा अशाप्रकारे पत्र दाखल करण्यात आला आहे. इंद्राणी मुखर्जी आपल्याच मुलीचा गळा आवळून खून करणे आणि मृतदेह जाण्याच्या आरोपांमध्ये मुख्य संशयित आहे. श्यामवर राय हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. जेव्हा शीनाची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे शीना जिवंत आहे, यावर शंका उपस्थित करण्यात आली. तसेच मृतदेहाच्या फेमर हाड व मणक्यांच्याचे हाड याची व इंद्राणी मुखर्जीच्या मणक्याची डीएनए तपासणी केली असता इंद्राणी मुखर्जी जैविक आई असल्याचे समोर आले. यामुळे इंद्राणी मुखर्जीने केलेला अर्ज हा निरर्थक असून सीबीआय व न्यायालयाची दिशाभूल करणारा आहे, असे उत्तर सीबीआयने इंद्राणी मुखर्जच्या पत्राला दिले.

हेही वाचा -Devendra Fadnavis connection with Iqbal Mirchi : इक्बाल मिर्चीकडून फडणवीसांनी 20 कोटी घेतले- ईडीकडे अनिल गोटेंची तक्रार

ABOUT THE AUTHOR

...view details