महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात तब्बल 35 हजार 383 जणांवर कारवाई - maharashtra lockdown

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्यभर कलम 144 लागू करण्यात आले. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यत आला. मात्र, अनेक ठिकाणी लोक प्रशासनाला मदत करत नसून नियमांचे उल्लंघन करत आहेत.

MAHARASHTRA CRIME
लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात तब्बल 35 हजार 383 जणांवर कारवाई

By

Published : Apr 11, 2020, 8:47 PM IST

Updated : Apr 11, 2020, 10:04 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत असून देशातील अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्यभर कलम 144 लागू करण्यात आले. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यत आला. मात्र, अनेक ठिकाणी लोक प्रशासनाला मदत करत नसून नियमांचे उल्लंघन करत आहेत. 22 मार्च ते 11 एप्रिल या काळामध्ये संपूर्ण राज्यात एकूण 35383 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तसेच क्वारंटाईनचे उल्लंघन करणाऱ्या 475 जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती गृह खात्याने दिली आहे.

लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 70 घटनांची नोंद झाली आहे. या गुन्ह्यात 161 आरोपींना अटक करण्यात आलीय. लॉकडाऊनमध्ये कोविड-19 च्या संदर्भात 61 हजार 056 फोन कॉल 100 क्रमांकाच्या नियंत्रण कक्षावर आले असून अनधिकृत वाहतुकीचे 803 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अनधिकृत वाहतूक प्रकरणी 2525 जणांना अटक करण्यात आली असून तब्बल 19 हजार 657 वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी या काळात एक कोटी 23 लाख 35 हजारांचा दंड ठोठावलाय. राज्यात कलम 144 व 188 नुसार पुणे शहरातून सर्वाधिक 4 हजार 583 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड 2808, नागपूर शहर 2311, नाशिक शहर 2255, सोलापूर 3021, अहमदनगर 3388, गुन्हे नोंदवण्यात आले असून सर्वाधिक कमी गुन्हे अकोला(48) येथे नोंदवण्यात आले आहेत.

Last Updated : Apr 11, 2020, 10:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details