महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुख्यमंत्री शिंदेंविरोधात 'महाप्रबोधन' करणे पडले महागात; ठाकरे गटाच्या डझनभर नेत्यांवर गुन्हा - Naupada Police Station

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे नुकत्याच झालेल्या महाप्रबोधन यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्या प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray यांच्या गटातील अर्धा डझनहुन अधिक नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

case registered against Thackeray group leaders
case registered against Thackeray group leaders

By

Published : Oct 11, 2022, 10:46 PM IST

ठाणे -ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे नुकत्याच झालेल्या महाप्रबोधन यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्या प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray यांच्या गटातील अर्धा डझनहुन अधिक नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. case registered against Thackeray group नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या वरीष्ठ नेत्यावर आता कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात महाप्रबोधन करणे हे ठाकरे गटातील नेत्यांना महागात पडले, असल्याची चर्च सद्या ठाण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -महाप्रबोधन यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्य वक्तव्य आणि नक्कल केल्याप्रकरणी ठाण्यात ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे, अनिता बिर्जे, मधुकर देशमुख, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे आणि सुत्रसंचाकल सचिन चव्हाण यांच्या विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात नौपाडा पोलीस ठाण्यात Naupada Police Station शिंदे गटाचे बाळा गवस यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदे गटात ठाकरे गटात तेढ निर्माण -उद्धव ठाकरे गटाकडून सध्या महाप्रबोधन यात्रा सुरू झाली आहे. त्याची सुरुवात रविवारी ठाण्यातून करण्यात आली. यावेळी या मेळाव्याला विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे आदींसह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांच्याकडून झालेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्य वक्तव्य आणि नकल करणे अशा स्वरूपाची तक्रार करण्यात आली आहे. अक्षय वारे वक्तव्यांमुळे शिंदे गटाने ठाकरे गटात तेढ निर्माण होईल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारची ही तक्रार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details