मुंबई -बंडखोर शिवसेना माजी नगरसेविका ( Rebel Shiv Sena former corporator ) शीतल म्हात्रे ( Sheetal Mhatre ) यांच्या कार्यालयवर लागलेल्या बॅनरवर काळी शाई ( Black ink on Sheetal Mhatre banner ) लावून त्यांना धमकी ( threatening )वजा घोषणा दिल्या प्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात 2 आरोपींविरोधात गुरुवारी दिनांक 14 रोजी गुन्हा दाखल केला गेला आहे.
दोघांविरोधात गुन्हा दाखल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या शिवसेनेच्या नेत्या आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे ( former corporator Sheetal Mhatre ) यांच्या विरोधात काही शिवसैनिक संतप्त ( Angry Shiv Sainik )झाले होते. यानंतर मुंबईच्या कांदळपाडा परिसरातील ( Mumbai Kandalpada Area ) शिवसेना शाखेजवळ लावलेल्या त्याच्या पोस्टरवर काही लोकांनी काळी शाई फासत त्याच्याविरोधात घोषणा दिल्या तसेच तुला बघुन देईन अशा धमकी वजा इशारा देण्यात आला होता. या घटनेनंतर आता एमएचबी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमएचबी कॉलोनी पोलिसांनी अक्षय राऊत आणि राहुल गावंड या आरोपींविरोधात भादंवि कलम 427, 504, 506, 34 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
शिंदे गटावर जोरदार टीका -शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. आठ दिवसांपूर्वीच म्हात्रे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांना वाघिण म्हणून संबोधले होते. पण अवघ्या आठ दिवसातच शीतल म्हात्रे यांनी घुमजाव केलं त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिंदे गटाला रस्त्यावर उतरून फटके देण्याची भाषा करणाऱ्या म्हात्रे यांनी शिंदे गटातच प्रवेश केल्याने अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.