महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कार डिझायनर दिलीप छाबरियांना 2 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी! - मुंबई न्यायालय

छाबरिया यांची एक गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या सीआययू युनिटने ही कारवाई केली.

दिलीप छाबरिया
दिलीप छाबरिया

By

Published : Dec 29, 2020, 4:34 PM IST

Updated : Dec 29, 2020, 7:07 PM IST

मुंबई :प्रसिद्ध कार डिझायनर, आणि डीसी कार्स कंपनीचे संस्थापक दिलीप छाबरिया यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार करण्याच्या आरोपाखाली त्यांना अटक केल्याचे समोर आले आहे. मुंबई न्यायालयाने छाबरिया यांना 2 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

एमआयडीसी भागातून दिलीप छाबरिया यांना अटक-

छाबरिया यांची एक गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या सीआययू युनिटने ही कारवाई केली. या यूनिटचे प्रमुख सचिन वाजे यांच्या पथकाने अंधेरीच्या एमआयडीसी भागातून दिलीप छाबरिया यांना अटक केली.

अधिक तपास सुरू-

पोलिसांनी छाबरिया यांच्यावर आयपीसीच्या कलम 420, 465, 467, 468, 471, 120 बी आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. दरम्यान, याबाबत अधिक तपास सुरू असून, आणखी काही लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच आणखी काही लोकांना अटक करण्यात येऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. मुंबई पोलिसांच्या मुख्यालयात दिलीप छाबरीया यांची एक स्पोर्ट्स कार पार्क करण्यात आली आहे.

2 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी-

डीसी कार्स कंपनीचे संस्थापक दिलीप छाबरिया यांना न्यायालयात हजर केले असता. त्यांना मुंबई न्यायालयाने 2 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

का केली दिलीप छाबरिया यांना अटक?-

बनावट गाड्याच्या व्यवहाराप्रकरणी अटक करण्यात आलेले डीसी डिजाईन कंपनीचे मालक दिलीप छाबरिया यांना मुंबईच्या न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. छाबरिया यांची डीसी डिजाईन ही कंपनी मोटार गाड्या विक्री तसेच मोटार गाड्यांचे मॉडिफिकेशनचे काम करते. तसेच अनेक पतसंस्थांकडून गाड्यांसाठी कर्ज पुरवले जात होते. परंतु पोलिसांना तपासणी करताना लक्षात आले की, एकच मोटारगाडी भिन्न-भिन्न रजिस्ट्रेशन नंबर तसेच गाडीच्या चेसी नंबर ने रजिस्टर आहे. त्यामुळे छाबरिया यांना अटक केल्याचे समजते.

एका गाडीवर अनेक पतसंस्था कर्ज पुरवठा करत आहे. यासोबतच मुंबई पोलिसांनी त्यांची गाडीही जप्त केली असून या प्रकरणात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा-'संपूर्ण जगाला कोरोनाची लस मिळेपर्यंत शांत बसणार नाही'

Last Updated : Dec 29, 2020, 7:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details