मुंबई -अँटिलिया कार स्फोटक प्रकरणी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एनआयएच्या हाती काही सीसीटीव्ही फूटेज लागले आहेत. याच्या सीसीटीव्हीच्या मदतीने सचिन वाझे यांच्यावरील संशय अधिक बळावला आणि सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली.
इनोव्हा मुंबई पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडताना सीसीटीव्हीत कैद गाडी बाहेर पडताना सीसीटीव्ही फुटेज -
कटासाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार CIU युनिटच्या अधिकाऱ्यांनी वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची दोन सीसीटीव्ही फुटेज एनआयएला मिळाली आहेत. यापैकी पहिले फुटेज हे 13 मार्चचे आहे. यामध्ये ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार दुपारी 3.15 वाजता पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडल्याचे दिसत आहे. त्यानंतर 24 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजून 24 मिनिटांनी ही कार पोलीस मुख्यालयातून बाहेर पडली होती. त्यानंतर ही इनोव्हा ठाण्याला गेली. यादरम्यान इनोव्हा गाडीची नंबरप्लेट बदलण्यात आल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्यासह संपूर्ण CIU युनिट अडचणीत आले आहे.
हे ही वाचा - मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
हे ही वाचा - नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही; पोलीस आयुक्तांचा इशारा