मुंबई -माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांच्या कारवाई संदर्भातील राज्यातील गृहविभाग आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या मधील गोपनीय पत्रव्यवहाराच्या फाईल संजय पूनामिया यांच्या व्हाट्सअप वर सापडल्या आहेत. (CAD chargesheet Anil Deshmukh) या फाईल (DCP)अभिषेक त्रिमुखे यांनी संजय पुनमिया यांना पाठवली होती, अशी माहिती सीआयडीने श्याम सुंदर अग्रवाल यांनी दाखल केलेल्या खंडणी प्रकरणातील आरोप पत्रात दिली आहे.
दोन हजार पानांचे आरोपपत्र
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी बिल्डर संजय पुनमिया यांच्या मोबाईलमध्ये सापडलेली काही गोपनीय कागदपत्रे राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात पुढे आली आहेत. (Parambir Singh Case) राज्य सीआयडीने पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, आशा कोरके यांच्यासह बांधकाम व्यावसायिक संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरुद्ध दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. आरोपपत्रात सीआयडीला पुनमियाच्या व्हॉट्सअॅप संदेशांचे विश्लेषण करताना आढळले आहे की माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणाशी संबंधित काही गोपनीय कागदपत्रे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी पुनमिया यांना पाठवली होती.
प्रकरणातील चार्जशीट आरोपपत्र किल्ला कोर्टात दाखल
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि इतरांविरुद्ध खंडणीच्या गुन्हा मरीन लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल करण्यात आला होता. व्यवसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्याकडून खंडणी मागितली प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानंतर या प्रकरणात मरीन लाईन पोलीस स्टेशनकडून हे प्रकरण (SIT)कडे वर्ग करण्यात आले होते. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून करण्यात येत आहे. आता या प्रकरणातील चार्जशीट आरोपपत्र किल्ला कोर्टात दाखल करण्यात आले आहे.
8 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली
श्याम सुंदर अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सीआयडीने या प्रकरणात किल्ला कोटामध्ये 2 हजार पानांची चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. यामध्ये सीआयडीने या प्रकरणात चार जणांविरोधात चार्जशीट दाखल केली आहे. यामध्ये संजय पुनामिया, सुनील जैन, PI नंदकुमार गोपाले आणि PI आशा कोरके यांच्या नावाचा समावेश आहे. या चारशीटमध्ये 50 पेक्षा जास्ती जणांचा बयान नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात PI नंदकुमार गोपाले आणि PI आशा कोरके या माजी पोलीस अधिकाऱ्यांना CID कडून 8 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण
गुन्हा मागे घेण्यासाठी बांधकाम व्यवसायिकांकडून खंडणी मागितल्याचा आरोप परमबीर सिंह यांच्यासह उपायुक्त अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पोलीस निरिक्षक आशा कोकरे, पोलीस निरिक्षक नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके हे वांद्रे गुन्हे शाखा कक्ष ९ मध्ये होते. श्यामसुंदर अग्रवाल यांचे पुतणे शरद अग्रवाल यांच्या तक्रारीवरून ठाण्याच्या कोपरी पोलीस स्टेशनमध्ये वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरण सीआयडीकडे हस्तांतरीत करण्यात आले
यापूर्वी मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. तपास करण्यात आला होता. त्यानंतर तेच प्रकरण सीआयडीकडे हस्तांतरीत करण्यात आले होते. ठाण्यातील बिल्डर अग्रवाल याने दिलेल्या तक्रारीवरून परमबीर सिंग, पोलीस उपायुक्त अकबर पठाण सह पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, आशा कोरकेसह काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात CID ने निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना अटक केली आहे.
हेही वाचा -Lata Mangeshkar health : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, आयसीयूत उपचार सुरू