महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त; उद्या ११ वाजता होणार नव्या मंत्र्यांचा शपथविधी - uddhav thackeray

मागील अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा होत होती. अलिकडेच झालेल्या खरिप हंगाम बैठकीच्या पत्रकार परिषदेत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत स्पष्ट संकेतही दिले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Jun 15, 2019, 2:36 PM IST

मुंबई- राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्या म्हणजेच रविवारी सकाळी ११ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात कोणकोणत्या नव्या मंत्र्यांची वर्णी लागणार? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रविवारी शपथविधीनंतर नवनिर्वाचित मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होऊ शकणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा होत होती. अलिकडेच झालेल्या खरिप हंगाम बैठकीच्या पत्रकार परिषदेत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत स्पष्ट संकेतही दिले होते. त्यानंतर १४ जूनला विस्तार होणार असे सांगितले जात होते, मात्र तरीही विस्ताराचे घोंगडे भिजत पडले होते. अखेर काल रात्री मुख्यमंत्र्यांनी स्वत:च द्विटद्वारे आपण विस्ताराबाबत उद्‌धव ठाकरे यांना भेटल्याचे ट्विट केले आणि विस्तार होणार हे नक्की झाले.

अनेकांना मिळणार डच्चू?
विद्यमान मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना हटविले जाणार असून त्यात घोटाळ्याचा आरोप झालेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांचे नाव अग्रेसर आहे. याशिवाय बबनराव लोणीकर, विष्णू सवरा, आत्राम, प्रवीण पोटे यांच्यासह काहींना डच्चू मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.

उध्दव ठाकरेंची घेतली भेट -
शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची माहिती दिली होती. याबाबत त्यांनी ट्विट देखील केले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री दिल्लीत जाणार असून, अमित शाह यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. दरम्यान शिवसेनेला १ कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता असून, अंतर्गत वाद नको म्हणून उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री पद नाकारल्याचे समजत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details