मुंबई- बेस्टने मंगळवारपासून प्रवाशांसाठी नवीन भाडे कपात लागू केली आहे. या बेस्ट उपक्रमाच्या निर्णयाचे बोरिवली-दहिसरमध्ये पेढे वाटून स्वागत करण्यात आले.
बेस्ट भाडे कपातीचे पेढे भरवून केले स्वागत
मंगळवारपासून बेस्टच्या प्रवाशांसाठी नवीन भाडे कपात लागू केली आहे. त्यामुळे कांदरपाडा येथून सुटणारी बस क्रमांक 245 मधील बेस्ट बसचालक, वाहक व प्रवाशांना गुलाबाचे फुल व पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागणी नंतर बेस्ट समिती, पालिका सभागृह व राज्य सरकार प्राधिकरणाने या भाडे कपातीस मंजुरी दिली होती. त्यामुळे म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, मुंबई बँक संचालक अभिषेक घोसाळकर व शिवसैनिकांनी बोरिवली आय. सी. कॉलनी तसेच दहिसर कांदरपाडा भागात फटाक्यांची आतषबाजी करत या निर्णयाचे स्वागत केले.
याप्रसंगी कांदरपाडा येथून सुटणारी बस क्रमांक 245 मधील बेस्ट बसचालक, वाहक व प्रवाशांना गुलाबाचे फुल व पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आज सकाळपासूनच बोरिवली-दहिसर भागात प्रवाशांनी रिक्षाकडे पाठ दाखवत बेस्ट बस थांब्यांवर गर्दी केली होती.