मुंबई- अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ( On the occasion of Akshayya Tritiya ) लोकांकडून सोने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळाला. हिंदू संस्कृतीच्या परंपरेप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी ही ( buying gold on Akshayya Tritiya ) सर्वात शुभ मानली जाते. गेल्या दोन वर्षापासून कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोने खरेदीकडे पाठ फिरवलेल्या सर्वसामान्य ग्राहकांनी आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली.
आज संपूर्ण देशामध्ये जवळपास साडेअकराशे कोटी रुपयांची सोने विक्रीत उलाढाल झाल्याचे सराफ व्यापारी ( gold bullion traders in the country ) सांगत आहेत. या एकूण उलाढालीपैकी 30 टक्के उलाढाल ( gold sell in Maharashtra ) महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्रात साडेतीनशे कोटीच्यावर आजच्या दिवसाची उलाढाल झाल्याची माहिती सोने व्यापारी आणि इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे ( Indian Bullion and Jewelers Association ) प्रवक्ते कुमार जैन यांनी दिली आहे. यापैकी खास करून 60 टक्के ग्राहक हे ग्रामीण भागातील असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.
पुढील जून महिन्यापर्यंत सोने व्यापारामध्ये वाढ होणार- खऱ्या अर्थाने आजपासून सोने व्यापारात तेजी आली आहे. काही दिवसांपूर्वीच गुढीपाडवा सण पार पडला. या दिवशीदेखील सोने खरेदीसाठी ग्राहकांची ओढ लागेल, अशी आशा सोने व्यापाऱ्यांना होती. मात्र, गुढीपाडव्याच्या दिवशी ग्राहकांकडून सोने खरेदीला तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ग्राहकांकडून सोने खरेदीला मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. पुढील जून महिन्यापर्यंत सोने व्यापारामध्ये वाढ होणार असल्याची शक्यतादेखील त्यांनी वर्तवली आहे.
लग्नसराईमुळे सोने व्यापारात तेजी येणार -गेली दोन वर्ष कोविडच्या प्रादुर्भावामुळे देशभरात अनेक कुटुंबांनी लग्न थांबविली होती. मात्र, आता कोविडचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाला आहे. त्यामुळे धुमधडाक्यात लग्न करण्यासाठी कुटुंबाकडून तयारी केली जात आहेत. केवळ मुंबई आणि महाराष्ट्रात जूनपर्यंत दहा लाख लग्न लावली जाणार आहेत. त्यापैकी 60 टक्के लग्न हे ग्रामीण भागात आहेत. तर 40 टक्के लग्न शहरी भागात आहेत. तर संपूर्ण देशभरात जून महिन्यापर्यंत जवळपास 40 लाख लग्न होणार आहेत. या सर्व लग्नांमध्ये मोठ्या प्रमाणात सोने खरेदीवर भर दिला जाईल, असा विश्वास कुमार जैन यांनी व्यक्त केला.