महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Breaking News Live : विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व 6 उमेदवार निवडून येतील - नाना पटोले - शस्त्रक्रिया

breaking news maharasthra
breaking news maharasthra

By

Published : Jun 18, 2022, 12:57 PM IST

Updated : Jun 18, 2022, 5:04 PM IST

17:02 June 18

विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व 6 उमेदवार निवडून येतील - नाना पटोले

विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व 6 उमेदवार निवडून येतील. केंद्र सरकार केंद्रीय संस्थांचा गैरवापर करते. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी धमक्या दिल्या गेल्या आणि आताही दिल्या जात आहेत. त्याची नोंद आमच्याकडे आहे आणि योग्य वेळी ती जनतेसमोर मांडू, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

15:42 June 18

विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अन् काँग्रेसला मतांची जुळवाजुळव करावी लागणार - अजित पवार

अजित पवार पत्रकार परिषद

विधानपरिषद याबाबत रणनीती

शिवसेनेसोबत असलेले अपक्ष उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने संपर्क केला होता

याबाबत मुख्यमंत्र्यांशी आपण स्वतः बोललो होतो

शिवसेनेचे दोन उमेदवार सहज निवडून येतील

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे

त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडून संपर्क करण्यात आले

मात्र शेवटी मुख्यमंत्री स्वतः बैठक घेऊन याबाबत निर्णय घेणार

मतांचा कोठा 26 असला तरी तो वाढवावा लागणार

राज्यसभेत निवडणूक लक्षात घेता कोठा थोडा जास्त ठेवावा लागेल

13:49 June 18

काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा, भाजप कार्यकर्ते कार्यालयावर सज्ज

अमरावती -नॅशनल हेरॉल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू असल्यामुळे संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज अमरावतीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्ते राजापेठ येथील कार्यालयावर सज्ज झाले आहेत.

13:24 June 18

संतोष जाधव टोळीतील सदस्यांकडून 13 गावठी पिस्तुल जप्त

पुणे - सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात संशयित आरोपी संतोष जाधव टोळीतील सदस्यांकडून पुणे ग्रामीण पोलिसांनी 13 गावठी पिस्तुल जप्त केल्या आहेत.

12:24 June 18

राज ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल, रविवारी होणार हिप बोनची शस्त्रक्रिया

मुंबई -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर होणारे हिप बोन्सची शस्त्रक्रिया अखेर रविवारी (दि. 19 जून) होणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे आज (दि 18 जून) लिलावती रुग्णालयात दाखल झाले असून शस्त्रक्रिया कधी करण्यात येणाऱ्या सर्व चाचण्या केल्या जातील नंतरच रविवारी राज ठाकरे यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात येईल. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांना शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले होते. मात्र, शस्त्रक्रिया अधिक करण्यात येणाऱ्या चाचण्यांमध्ये राज ठाकरे यांच्या शरीरात कोरोनाचे डेड सेल्स सापडल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

Last Updated : Jun 18, 2022, 5:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details