ठाणे -अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायलयाने जामीन मंजूर (Thane Court Bail to Ketaki Chitale) केला आहे. तिला अॅट्रोसिटी अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आज ठाणे न्यायालयाने अखेर तिला जामीन मंजूर केला. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात २०२० साली अॅट्रोसेटी कायद्याअंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Maharashtra Live Breaking Page : नशेसाठी वापरला जाणारा 40 लाखांचा औषधांचा साठा NCB कडून जप्त
16:34 June 16
ठाणे न्यायालयाकडून केतकी चितळेला जामीन
15:34 June 16
नशेसाठी वापरला जाणारा 40 लाखांचा औषधांचा साठा NCB कडून जप्त
मुंबई - नशेसाठी वापरल्या जाणाऱया 40 लाखाचा औषधांचा साठा NCB कडून जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत 7200 बाटल्या NCB ने भिवंडी परिसरातून जप्त केल्या आहेत. या प्रकरणी 2 जणांना NCB ने अटक केली आहे. जप्त केलेल्या मालाची अंदाजे 40 लाख रुपये किंमत असल्याची माहिती आहे. या बाटल्या कुणी पाठवल्या होत्या त्या कुठे कुठे त्याची विक्री केली जाणार होती याचा NCB चे अधिकारी तपास करत आहेत.
14:08 June 16
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा
मुंबई- दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. उद्या दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.
13:14 June 16
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका
मुंबई- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अधीश बंगल्यावरील कारवाई विरोधात प्राधिकरणाकडेच दाद मागण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. मात्र राणेंना दिलासा देत 24 जूनपर्यंत बेकायदेशीर बांधकामावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश कायम राहणार आहेत. राणे यांना एमसीझेडएमएने पाठवलेली नोटीस योग्यच असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, पाठविलेली नोटीस बेकायदेशीर असल्याचा दावा करत नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका निकाली काढण्यात आली.
12:50 June 16
समीर वानखेडेंच्या याचिकेवर दोन आठवड्यात उत्तर द्या, उच्च न्यायालयाचे जात पडताळणी समितीला निर्देश
मुंबई- मद्य परवाना मिळवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर खोटी माहिती दिल्याच्या कारणाखाली पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर याला एनसीबीचे तत्कालीन प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्याकडून याचिकांद्वारे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. यावर मागील आठवड्यात सुनावणी पुढे ढकलल्यानंतर आज समीर वानखेडेंच्या याचिकेवर दोन आठवड्यात उत्तर द्या असे उच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीला निर्देश दिले आहेत. तसेच यावर तातडीने निर्णय घेऊन दोन आठवड्यात उत्तर द्या असे उच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीला बजावत निर्देश दिले आहेत.
12:39 June 16
कचऱ्यातून १० तोळे सोने जप्त, सोन्याने भरलेली पिशवी शोधण्यात उंदराने दाखवला पोलिसांना रस्ता
मुंबई- दिंडोशी परिसरात एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मुंबई पोलिसांनी १० तोळे सोने जप्त केलं आहे. ही सोन्याची पिशवी कोरडा पाव समजून भिकाऱ्याने कचऱ्यात फेकली होती. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी ढिगाऱ्यातून दागिन्यांची पिशवी काढून पीडित महिलेला दिली. या सोन्याची किंमत सुमारे ५ लाख रुपये आहे.
11:34 June 16
मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी देण्याच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे.
11:03 June 16
मध्य प्रदेशातील विवाह कार्यक्रमाला जाणाऱ्या वऱ्हाडाचा अपघात, सात जणांचा मृत्यू
भोपाळ- मध्य प्रदेशातील विवाह कार्यक्रमाला जाणाऱ्या वऱ्हाडाच्या वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे.
10:56 June 16
किराणा घेण्यासाठी जाणाऱ्या तीनही बालकांचा नदीतील खड्ड्यात बुडून मृत्यू
नंदूरबार - धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडा येथे दुपारी किराणा घेण्यासाठी जात असलेले तीन चिमुकले नदी ओलांडत होते. यावेळी तीनही चिमुकले नदीतील खड्ड्यात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अतिदुर्गम भागात घटना घडल्यामुळे याबाबत जळगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
10:51 June 16
मुंबईत पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी
मुंबई- मुंबईत ११ जूननंतर पावसाने पाठ फिरवली होती. आज पाच दिवसांनी पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत काही ठिकाणी पाऊस पडत आहे. आज ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी पावसाच्या सरी किंवा मध्यम पाऊस पडू शकतो असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
10:47 June 16
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलविली तातडीची बैठक
मुंबई-ओबीसी समाजाचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम समर्पित आयोग करत असले तरी, आडनावाच्या आधारावर इम्पेरिकल डेटा गोळा केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासहित मंत्री छगन भुजबळ यांनीही केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्पित आयोग इम्पेरिकल डेटा गोळा करत असल्यास संदर्भात सायंकाळी सहा वाजता शासकीय निवासस्थान वर्षा बंगला येथे तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहीत इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
10:30 June 16
अग्नीपथ भरती योजनेविरोधात बिहारमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन, रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळित
पाटणा- सशस्त्र दलांसाठी नुकत्याच जाहीर झालेल्या अग्निपथ भरती योजनेच्या विरोधात जेहानाबादमध्ये तरुणांनी आंदोलन केले. आंदोलक विद्यार्थ्यांमुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. नवाडा येथे सशस्त्र दलांसाठी नुकत्याच जाहीर केलेल्या अग्निपथ भर्ती योजनेच्या निषेधार्थ मोठा जमाव जमला होता.
10:18 June 16
अभिनेत्री केतकी चितळेची मुंबई उच्च न्यायालयात नवी याचिका
मुंबई- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी केतकी 14 मे पासून पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेने मुंबई उच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे.
10:05 June 16
विधान परिषदेचे दोन आमदार निवडून आणण्याची क्षमता- संजय राऊत
अयोध्या-आमदार निवास नसल्याने आमदारांना हॉटेलात ठेवावे लागते. विधान परिषदेचे दोन आमदार निवडून आणण्याची क्षमता असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. नवाब मलिक यांना रद्द करून त्यांच्यावर दुसऱ्यांदा अन्याय नको, असेही खासदार राऊत यांनी म्हटले आहे.
09:59 June 16
आमच्या हिंदुत्वाला विरोधकांकडून प्रमाणपत्राची गरज नाही- संजय राऊत
अयोध्या- भाजपने राजकीय सोयीसाठी भूमिका बदलल्या आहेत. आमच्या हिंदुत्वाला विरोधकांकडून प्रमाणपत्राची गरज नाही, असा टोला खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
09:36 June 16
दारू विक्रीच्या वादातून अल्पवयीन आरोपीने केली तरुणाची हत्या
नागपूर-अवैध दारू विक्रीच्या वादातून निलडोह भागात एका तरुणाची हत्या झाली आहे. हिंगणाच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत निलडोह या गावात एका २२ वर्षीय तरुणाची त्याच गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने धारदार हत्याराने हत्या केल्याची घटना रात्री उशिरा जुना निलडोहच्या मागच्या रस्त्यावर असलेल्या पुलाजवळ घडली आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
09:13 June 16
जुहू येथील हॉटेलमध्ये 35 वर्षीय महिलेवर बलात्कार पीडितेला कुख्यात गुंड दाऊदची धमकी ?
मुंबई-अंधेरीतील जुहू येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये 35 वर्षीय महिलेवर एका 75 वर्षीय व्यावसायिकाकडून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात अंबोली पोलिस स्टेशन मध्ये आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेला व्यवसाय का विरुद्धा केलेली तक्रार वापस घेण्यासाठी व्यापार्याने महिलेला याची वाश्चता कुठेही न करण्यासाठी डी कंपनीची धमकी दिल्याने पोलिस कामाला लागले आहेत.
09:05 June 16
कांजुरमार्ग कोविड सेंटर होणार बंद
मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. रुग्ण संख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल केल्या जाणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे आवश्यकता नसलेली जम्बो कोरोना केंद्र बंद करून तेथील साहित्य पालिकेच्या इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. दहिसर येथील कोविड सेंटर पाठोपाठ कांजुरमार्ग येथील कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. तेथील ऑक्सिजन प्लांट मुलुंड जकात नाका येथील जागेत हलवला जाणार आहे.
08:59 June 16
धुळ्यात प्रेमसंबंधाच्या कारणावरून बहिणीचा भावाकडून गळफास देऊन केला खून
धुळे-प्रेमसंबंध असलेल्या व्यक्तीबरोबर पळून जाण्याच्या बेतात असलेल्या २२वर्षीय बहिणीचा साडीच्या लेसने गळफास देऊन भावाने खून केला आहे. पुरावेही नष्ट केले. गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी संदीप रमेश हालोर (वय २४,राहणार हट्टी, तालुका साक्री,जिल्हा धुळे ) याला अटक करण्यात आली आहे.
07:43 June 16
बुलडोझर कधीही तुमच्या घरी येऊ शकतो- राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत
जयपूर-दुसर्यावर बुलडोझर चालल्याने तुम्ही खूश आहात. तो बुलडोझर कधीही तुमच्या घरी येऊ शकतो. बुलडोझर चालविणे योग्य असेल तर त्याचे स्वागत करा. आज त्याच्यासोबत अन्याय झाला तर उद्या तुमच्यासोबतदेखील अन्याय होईल, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.
07:36 June 16
ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या ४ ड्रग पेडलरला वडोदरा पोलिसांकडून अटक
अहमदाबाद- वडोदराचे सहायक पोलीस आयुक्त जे. बी. गौर यांनी सांगितले की, ४ ड्रग पेडलरला अटक केली आहे. मध्य प्रदेश ते वडोदरात ड्रग्ज पुरवठा करण्यात त्यांचा सहभाग आहे.
06:19 June 16
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा
मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. रुग्ण संख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल केल्या जाणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे आवश्यकता नसलेली जम्बो कोरोना केंद्र बंद करून तेथील साहित्य पालिकेच्या इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. दहिसर येथील कोविड सेंटर पाठोपाठ कांजुरमार्ग येथील कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. तेथील ऑक्सिजन प्लांट मुलुंड जकात नाका येथील जागेत हलविला जाणार आहे.