मुंबई -उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी आणि केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांवरील दडपशाही विरोधात ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता, सर्वांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्रपक्षही सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादाजी भुसे, दुग्धमंत्री सुनील केदार यावेळी उपस्थित होते.
लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ येत्या 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक - ताज्या बातम्या
21:56 October 06
लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ येत्या 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक
18:43 October 06
राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांच्या आरोपांना एनसीबीचे उत्तर
- नवाब मलिकांचे आरोप एनसीबीने फेटाळून लावले आहेत. क्रुझवरील कारवाई नियमानुसार झाली असल्याचा एनसीबीचा दावा.
- किरण गोसावी आणि मनीष भानुशाली यांच्या माहितीच्या आधारावर छापा टाकला गेल्याचे एनसीबीने म्हटले आहे.
- आर्यन खानसह आठ आरोपींना ड्रग्जसह ताब्यात घेतले होते.
17:32 October 06
मुंबई - लखीमपूर खीरी शेतकरी हत्याकांड प्रकरणी 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा.
14:49 October 06
भाजप एनसीबीचा वापर करुन लोकांना अटक करत आहे - नवाब मलिक
मुंबई - क्रुझवरील ड्रग प्रकरणात एनसीबीने केलेल्या कारवाईनंतर मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली आहे. क्रुझवर कोणतेही ड्रग सापडले नाही. ते फोटो क्रुझवरचे नसून, तर लाईव्ह लाईटवरील आहेत. त्यामुळे एनसीबीला ठराविक लोकांनाच पकडायचे होते, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
13:25 October 06
Breaking News - कोर्डीला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आणखी 5 जणांना केली अटक
मुंबई - कोर्डीला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आणखी 5 जणांना अटक केली आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने ही कारवाई केली आहे. आज दुपारी 3 नंतर रिमांडसाठी न्यायालयात त्यांना हजर केले जाणार आहे. आर्यन खानसह अटक केलेल्यांची एकूण संख्या आता 17 झाली आहे पकडलेल्यांपैकी पार्टी आयोजित करणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीशी संबंधित आहेत.
13:20 October 06
Breaking News - राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे प्रकृती अस्वस्थ्यमुळे बॉम्बे रुग्णालयात दाखल
मुंबई - राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे प्रकृती अस्वस्थ्यमुळे बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले आहेत. खडसेंची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती त्यांच्या वकिलांद्वारे कोर्टात देण्यात आली आहे. पुणे भोसरी भूखंड या प्रकरणी एकनाथ खडसे यांना आज ईडी समोर हजार राहायचे होते. ईडीने त्यांना समन्स बजावले होते.
11:22 October 06
ड्रग्ज केस - एनसीबीने आणखी एका व्यक्तीला घेतले ताब्यात
एनसीबीने आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतले.
मुंबई एनसीबीने काल रात्री पवई परिसरातून आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन एनसीबी कार्यालयात नेले.
अचिंत कुमार असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याला मुंबईच्या पवई परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.
त्याच्याकडून काही प्रमाणात औषधेही जप्त करण्यात आली आहेत.
ही व्यक्ती कॉर्दिला क्रुझ प्रकरणाशी संबंधित आहे.
मुंबई एनबीसी काल रात्रीपासून वांद्रे, जुहू आणि गोरेगाव भागात छापेमारी केली आहे.
10:52 October 06
Breaking News - मुंबई-पुणे एक्सप्रेसवर टेम्पो ट्रकचा अपघात, चालकाचा जागीज मृत्यू
मुंबई - मुंबई-पुणे एक्सप्रेसवर टेम्पो ट्रकचा अपघात होऊन झाल्याने टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघातात समोरच्या ट्रकला मागून टेम्पोने धडक दिल्याने झाला. यामध्ये टेम्पो चालकाचा मृत्यू झाला आहे.
10:17 October 06
यंदा दसरा मेळावा होणार-शिवसेना खासदार संजय राऊत यांची माहिती
यंदा दसरा मेळावा होणार
शिवसेना खासदार संजय राऊत यांची माहिती
दिल्लीत पत्रकार परिषदेत राऊत यांनी दिली प्रत्यक्ष दसरा मेळाव्याची माहिती
कोरोनामुळे दसरा मेळावा ऑनलाईन घ्यावा लागला होता.
09:55 October 06
कोल्हापूर ब्रेकिंग - इचलकरंजीत एसटी आगारात घुसून एसटीवर दगडफेक
कोल्हापूर ब्रेकिंग -
इचलकरंजीत एसटी आगारात घुसून एसटीवर दगडफेक
६ एसटी कर्मचाऱ्यांवर हल्ला
काही कर्मचाऱ्यांवर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू
जवळपास सात ते आठ एसटीची तोडफोड
सात ते आठ जणांनी येऊन धुडगूस घातल्याचा प्रकार
अज्ञात सात ते आठ जणांच्यावर इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू
09:14 October 06
गॅस पुन्हा महागला - घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 15 रुपयांची वाढ
पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 15 रुपयांनी वाढ केली आहे. दिल्लीत विनाअनुदानित 14.2 किलो सिलेंडरची किंमत आता 899.50 रुपये आहे. 5 किलो सिलिंडरचा नवीन दर आता 502 रुपये आहे. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत.
08:49 October 06
औरंगाबाद ब्रेकिंग - नामका कालव्यात आढळला अनोळखी मृतदेह
औरंगाबाद ब्रेकिंग -
नामका कालव्यात आढळला अनोळखी मृतदेह
मृतदेह काढण्यासाठी कोणीच पुढे येत नसल्याने पोलीस उपनिरीक्षक यांनी स्वतः अर्धा तास पोहून मृतदेह काढला बाहेर
औरंगाबादच्या विरगाव ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नवनाथ कदम यांची कामगिरी
08:38 October 06
औरंगाबाद ब्रेकिंग - जीवघेण्या खड्ड्यामुळे रस्त्यातच मातेची प्रसूती
औरंगाबाद ब्रेकिंग -
जीवघेण्या खड्ड्यामुळे रस्त्यातच मातेची प्रसूती
औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातिल शिवूर येथील धक्कादायक घटना
08:29 October 06
डोंबिवली - मित्रानेच मित्राचा खून करून मृतदेह टाकला रेल्वे रुळावर
मित्रानेच मित्राचा खून करून मृतदेह टाकला होता रेल्वे रुळावर
डोंबिवली रेल्वे पोलिस हद्दीतील ठाकुर्ली तील ९० फुटी रस्त्यालगतची आज पहाटे ५ च्या दरम्यानची घटना.
रेल्वे अपघात असल्याचे भासवण्यासाठी मृतदेह टाकला रेल्वे रुळावर.
मृतदेहावरून रेल्वे गेल्याने मृतदेहाच्या चेहर्याचा झाला होता चेंदा मेंदा.
मात्र पोलिसांनी फोडली खूनाला वाचा.
आरोपी टिळक नगर पोलिसांच्या ताब्यात.
डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल
08:25 October 06
लखीमपूर खेरी घटनेवर राज्यमंत्री अजय टेनी यांचे स्पष्टीकरण
लखीमपूर खेरी घटनेवर राज्यमंत्री अजय टेनी यांचे स्पष्टीकरण - माझा मुलगा गाडीत नव्हता. कारवर हल्ला झाल्यानंतर, चालक जखमी झाला. कारने आपला बॅलन्स गमावला आणि तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांवरुन कार गेली. ज्यांनी आपला जीव गमावला आहे त्यांच्याबद्दल मी सहानुभूती व्यक्त केली आहे. निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे.
07:35 October 06
Breaking : भाजप एनसीबीचा वापर करुन लोकांना अटक करतंय; नवाब मलिक यांचा आरोप
Breaking News - रामायण सिरीयलमधील प्रसिद्ध अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन
रामायण सिरीयलमधील प्रसिद्ध अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले आहे. त्यांनी रामानंद सागर यांच्या रामायण या सिरीयलमध्ये रावणाची भूमिका केली होती.