मुंबई -वैद्यकीय सेवा, दूरसंचार क्षेत्र, गॅस पुरवठा, जलपुरवठा शासकीय अधिकारी आदींना आता दोन्ही लस घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंदर्भातील राज्य शासनाने परिपत्रक जारी केला आहे. अत्यावश्यक सेवे वर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी लस बंधनकारक न करता पास दिला जात होता.
मासिक, त्रैमासिक पास मिळणार -
कोरोना लसींचे दोन डोस घेऊन १४ दिवसांचा कालावधी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सर्वसामान्यांना लोकल प्रवासाला बंदी आहे. आवश्यक सेवेत काम करणाऱ्यांना या नियम आतापर्यंत लागू नव्हता. वैद्यकीय कारणास्तव तसेच वृद्धापकाळामुळे लस न घेऊ शकणारे लोक सामील होते. मात्र आता लसीकरणाचा मुबलक साठा आणि वेग वाढल्याने लस अनिवार्य केली आहे. त्यामुळे आवश्यक सेवेतील तसेच शासकीय सेवेतील लोकांना सामील केले आहे. यापुढे प्रवासासाठी सार्वत्रिक (युनिव्हर्सल) पास अशाच व्यक्तींना दिला जाईल. त्याच बरोबर लोकल किंवा पॅसेंजर ट्रेनने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी मासिक त्रेमासिक सहा मासिक पास त्याचा प्रवाशांना देण्यात येईल, असे राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
कोरोनाचे दोन्ही डोस घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासास मुभा -
कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. यापूर्वी गेल्या दीड वर्षांपासून अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आतापर्यंत त्यांनी लस घेतली आहे किंवा नाही हे न बघता रेल्वेचा पास देण्यात येत होते. कारण कोरोना काळात अत्यावश्यक सेवेवर विपरित परिणाम होऊ नयेत म्हणून ही मुभा देण्यात आली होती. मात्र, आता राज्य सरकारनेही मुभा काढून टाकण्यात आली आहे. कारण सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु आहे. सध्या लसींचा साठाही मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणेच लसीच्या दोन मात्र घेणाऱ्याच कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासात मुभा देणार आहे.