महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : तपास सीबीआयकडे वर्ग करण्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण

By

Published : Aug 4, 2020, 10:55 AM IST

Updated : Aug 4, 2020, 11:05 AM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास केला जात आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याच्या जनहित याचिकेवर आज मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे. ही याचिका समित ठक्कर यांनी त्यांचे वकील रासपाल सिंग रेणू यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

मुंबई महापालिका प्रशासनाने बिहार पोलिसांना बळजबरीने केले क्वारंटाईन

अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात करण्यासाठी पाटणा पोलिसांनी आयपीएस विनय तिवारी यांच्या नेतृत्वाखाली चार पोलीस अधिकारी मुंबईत पाठविले आहेत. मात्र मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना मुंबई महापालिका प्रशासनाने बळजबरीने क्वारंटाईन केले असल्याचा आरोप बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी केला आहे.

Last Updated : Aug 4, 2020, 11:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details