मुंबई -बॉलिवूडचे मिस्टर इंडिया बॉडीबिल्डर मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणामध्ये स्वतःची बाजू मांडली. मनोज पाटील म्हणाले की, साहिल खानने मला त्रास देणाऱ्या लोकांच्या टोळीचा भाग असल्याचा मुद्दाम आरोप केला होता. तसेच भारताला गौरव मिळवून देण्यासाठी ऑलिम्पिकची तयारी करायची होती. पण स्वप्न उध्वस्त करण्याची धमकी वारंवार दिली जात होती.
मनोज पाटील यांनी या प्रकरणाबाबत साहिल खान यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. परंतु पोलिसांनी कारवाई केली नाही. नाराज होऊन मनोजने सुसाईड नोट लिहून झोपेच्या गोळ्यांचे सेवन केले होते. नंतर पोलिसांनी साहिल खानवर गुन्हा दाखल केला. रुग्णालयातून बरे झाल्यानंतर मनोज पाटील यांना मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे समर्थन मिळेल असे सांगण्यात आले. सध्या मनोज पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर आशा व्यक्त केली असून त्यांनी कृष्णकुंजला जाऊन न्याय मिळण्याची आशा व्यक्त केली आहे.