महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BMC Budget 2022 : मुंबई महापालिकेचा 45 हजार कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; 8.43 कोटी शिलकीचा अर्थसंकल्प - BMC Budget in standing committee

मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सन २०२२ - २३ चा( BMC Budget 2022 ) ४५९४९.२१ कोटी रुपयांचा ( Rs 45949 crore budget ) अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना ( Standing committee chairperson Yashwant Jadhav ) सादर केला.

मुंबई महापालिका
मुंबई महापालिका

By

Published : Feb 22, 2022, 3:44 PM IST

Updated : Feb 22, 2022, 5:43 PM IST

मुंबई- मुंबई महानगरपालिकेचा सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी ( BMC Budget 2022 ) 45 हजार कोटींचा ( Rs 45949 crore budget ) अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये सादर करण्यात ( BMC Budget in standing committee ) आला होता. या अर्थसंकल्पावर तब्बल 11 तास चर्चा झाली आहे. या चर्चेत 12 सदस्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर आज मंगळवारी हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव ( Standing committee chairperson Yashwant Jadhav ) यांनी दिली.

मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव म्हणाले, की 650 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.य त्याचे प्रचलित नियमानुसार वाटप केले जाईल.

नगरसेवक पत्र देतील त्यांच्या कामासाठी निधी राखीव

हेही वाचा-वेतन कपात हा खोडसाळपणा केवळ माथी भडकवण्यासाठी - मंत्री अनिल परब

६५० कोटींचे प्रचलित नियमानुसार वाटप करणार -
मुंबई महानगरपालिकेचा सन 2022 - 23 या आर्थिक वर्षासाठी 45 हजार 949 कोटींचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे 3 फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी सादर केला होता. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी 11 मार्चला यावर आपले अर्थसंकल्पीय भाषण केले. या अर्थसंकल्पावरील चर्चेत सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक अशा 12 सदस्यांनी सहभाग घेतला. पालिकेच्या 'ब' अर्थसंकल्पातून 'अ' अर्थसंकल्पात 650 कोटींचा निधी वळविल्याने स्थायी समितीला 650 कोटींचा निधी प्राप्त झाला. यामधून नव्याने बनवण्यात आलेल्या 236 प्रभागांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पालिकेची मुदत येत्या 7 मार्चला संपत आहे. पालिकेच्या 24 विभागात निधीचे सामान वाटप केले जाणार आहे. यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाचे नगरसेवक जास्त किंवा कमी संख्येने निवडून आल्यास कोणावरही अन्याय होणार नाही, याप्रमाणे वाटप केले जाईल. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांना त्यांच्या नगरसेवकांच्या संख्येच्या प्रमाणात निधीचे वाटप करण्याचा निर्णय येत्या काळात घेतला जाईल, अशी माहिती यशवंत जाधव यांनी दिली.

हेही वाचा-Russia-Ukraine Conflict : रशिया-युक्रेन युद्धाचा काय होईल भारतावर परिणाम? जाणून घ्या...

पत्र देईल त्याला निधी -
आज अर्थसंकल्प मंजूर करताना 650 कोटी रुपये स्थायी समितीला मिळाले आहेत. त्यात पालिकेच्या प्रत्येक वॉर्डला निधी दिला जाणार आहे. यासाठी नगरसेवकांना आपल्या विभागातील किंवा इतर कामांसाठी पत्र देऊन सुचवावी लागणार आहेत. अशी पत्र देण्याचे सर्वपक्षीय गटनेत्यांना सांगण्यात आले आहे. जे नगरसेवक पत्र देतील त्यांच्या कामासाठी निधी राखीव ठेवला जाईल, अशी माहिती यशवंत जाधव यांनी दिली.

हेही वाचा-ST Strike : संपामुळे झालेले नुकसान कामगारांकडून वसूल करण्याचा महामंडळाचा कोणताही निर्णय नाही- शेखर चन्ने

आम्ही कामातून उत्तर देऊ -
भाजप प्रत्येक कामाला विरोध करते. चांगले काम केले तरी ते विरोध करतात. विरोध हा त्यांच्या नसानसात भिनलेला आहे. चांगले काही करायचे नाही. चांगले केले तर त्याला विरोध करायचा हेच त्यांचे काम आहे. ते विरोध करत राहतील, आम्ही विकासाचे काम करत राहू. मुंबईकरांनी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली आहे. आम्ही मुंबईचा विकास करत राहू असे यशवंत जाधव म्हणाले.

४५९४९.२१ कोटींचा अर्थसंकल्प -
मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सन २०२२ - २३ चा ४५९४९.२१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला. २०२१ - २२ चा ३९०३८.८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. ८.४३ कोटी शिलकीचा हा अर्थसंकल्प आहे. २०२२ - २३ चा अर्थसंकल्प २०२१ - २२ या वर्षापेक्षा १७.७० टक्के मोठा आहे. मागील वर्षापेक्षा यंदाचा अर्थसंकल्प ६९१०.३८ कोटींनी वाढला आहे. २०२१ - २२ च्या आर्थिक वर्षात महसूली खर्च २०२७६.३३ कोटी वरून २२७४४..८७ कोटी असा सुधारित करण्यात आला आहे. २०२२ - २३ साठी महसुली खर्च २३२९४.०५ कोटी इतका प्रास्ताविण्यात आला आहे. तर २०२१ मध्ये भांडवली खर्च १८७५०.९९ कोटी अंदाजाला होता. तो १६८६६ कोटी असा सुधारित करण्यात आला आहे. जानेवारी २०२२ पर्यंत ९५७५.४८ कोटी म्हणजेच ५६.७७ टक्के खर्च झाला आहे. २०२२- २३ या वर्षासाठी २२६४६.७३ कोटी भांडवली खर्चासाठी तरतूद करण्यात आली आहे.

Last Updated : Feb 22, 2022, 5:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details