महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रेल्वे प्रवासासाठी मुंबई महापालिकेचे बनावट ओळखपत्र देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई - BMC additional commissioner Sursh Kakani

लोकल सेवा बंद असल्याने कामावर जाणे शक्य होत नसल्याने व्यापारी, कामगार वर्ग आदींनी बनावट ओळखपत्राचा आधार घेत प्रवास करण्यास सुरुवात केली. परंतु रेल्वे पोलिसांच्या ही गंभीर बाब लक्षात येताच क्यू आर कोड व ओळखपत्र तपासण्याची मोहीम हाती घेतली.

बनावट ओळखपत्र
बनावट ओळखपत्र

By

Published : Oct 18, 2020, 5:19 AM IST

मुंबई- मुंबईची लाईफ लाईन असलेल्या रेल्वेमधून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची मुभा आहे. काही प्रवाशांनी मुंबई महापालिकेचे बनावट ओळखपत्र वापरून प्रवास केल्याचे उघड झाले आहे. अशी ओळखपत्र देणाऱ्या पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मुंबईत आढळल्यानंतर मुंबईत लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले होते. परंतु आता कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिका आरोग्य विभागाला यश येत आहे. कोरोना आटोक्यात येत असल्याने टप्याटप्प्याने अनलाॅक जाहीर करत अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांसाठी १५ जूनपासून लोकल धावू लागली आहे. मात्र सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलचे दरवाजे बंद आहेत. लोकल सेवा बंद असल्याने कामावर जाणे शक्य होत नसल्याने व्यापारी, कामगार वर्ग आदींनी बनावट ओळखपत्राचा आधार घेत प्रवास करण्यास सुरुवात केली. परंतु रेल्वे पोलिसांच्या ही गंभीर बाब लक्षात येताच क्यू आर कोड व ओळखपत्र तपासण्याची मोहीम हाती घेतली. या मोहीमेतंगर्त बनावट ओळखपत्रावर महिला प्रवाशांसह पुरुष प्रवासी प्रवास करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

मायानगरी मुंबईत शाॅर्टसकटसाठी नेहमीच नवनवीन युक्त्या वापरल्या जात असल्याचे अनेक वळा समोर आले आहे. लोकलने प्रवास करता यावा यासाठी बनावट ओळखपत्राचा आधार घेत प्रवास करत असल्याचे रेल्वे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईत मुंबई महापालिकेची बोगस ओळखपत्र बनवण्यात आल्याचेही समोर आले आहे. पालिकेतून कोणी बनावट ओळखपत्र दिले असेल तर त्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून मागवण्यात आली आहे. पालिकेतून कोणी बनावट ओळखपत्र दिले असेल तर त्या संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. या गंभीर प्रश्नाबाबत रेल्वे पोलीस व मुंबई पोलीस यांना सूचना करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details