महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Ganesh 2022 गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेची यंत्रणा सज्ज

By

Published : Sep 8, 2022, 6:01 PM IST

Mumbai Ganesh 2022 मुंबईमध्ये गेल्या अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. Mumbai Ganesh 2022 हा प्रसार कमी झाल्याने निर्बंध हटवण्यात आले आहे. त्यानंतर मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरी केला जात आहे. उद्या शुक्रवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले जाणार असून त्यासाठी ७३ नैसर्गिक आणि १५२ कृत्रिम विसर्जनस्थळी मुंबई महानगरपालिकेने Mumbai Municipal Corporation लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

Mumbai Ganesh 2022
Mumbai Ganesh 2022

मुंबईमुंबईमध्ये गेल्या अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. Mumbai Ganesh 2022 हा प्रसार कमी झाल्याने निर्बंध हटवण्यात आले आहे. त्यानंतर मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरी केला जात आहे. उद्या शुक्रवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले जाणार असून त्यासाठी ७३ नैसर्गिक आणि १५२ कृत्रिम विसर्जनस्थळी मुंबई महानगरपालिकेने लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. विसर्जनासाठी महापालिका Mumbai Municipal Corporation सज्ज असल्याची माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे Municipal Commissioner Ashwini Bhide यांनी दिली.

विसर्जनासाठी महापालिका सज्जमुंबईमध्ये ३१ ऑगस्टला लाडक्या बाप्पाची स्थापना करण्यात आली. दीड, पाच, सहा आणि सात दिवसांच्या २ लाख ११ हजार गणेश मुर्त्यांचे आतापर्यंत विसर्जन झाले आहे. 10 दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी पालिकेच्या तयारीची माहिती देताना आश्विनी भिडे बोलत होते. Mumbai Municipal Corporation System Ready यावेळी बोलताना, ७३ नैसर्गिक आणि १५२ कृत्रिम विसर्जनस्थळी पालिकेच्या वतीने १८८ नियंत्रण कक्ष तसेच २११ स्वागत कक्ष उभारण्यात आले आहेत. चांगल्या प्रकाश योजनेसाठी ३०६९ फ्लड लाईटस आणि ७१ सर्च लाईट लावण्यात आल्या आहेत. वैद्यकीय सामुग्रीसह १८८ प्रथमोपचार केडनर व ८३ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. ४८ निरीक्षण मनोरे, १३४ टाटापुरती शौचालये, वाहनांची चाके वाळूमध्ये ऋतू नयेत यासाठी ४६० स्टील प्लेट्स बसवण्यात आल्या आहेत. आवश्यक ठिकाणी क्रेनची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती भिडे यांनी दिली.

मुंबई महापालिकेची यंत्रणा सज्ज

यलो अलर्टसाठी पालिका सज्ज गणेश विसर्जन होत असताना शुक्रावर ते रविवार या 3 दिवसात मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विसर्जनादरम्यान समुद्रात बुडून मृत्यू होण्याची घटना घडू नये यासाठी पालिकेने ७८६ जीवरक्षक नियुक्त केले आहेत. आवश्यक त्याठिकाणी ४५ मोटार बोट व ३९ जर्मन तराफ्यांची व्यवस्था केली आहे. जे भाविक विसर्जनाला येतील त्यांना थेट समुद्रात जाता येणार नाही. पालिका कर्मचारी मुर्त्यांचे विसर्जन करतील. पण ज्यांना अनुभव आहे आणि मुर्त्यांची उंची पाहून स्थानिक पातळीवर भाविकांना विसर्जनाला सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल असेही भिडे यांनी सांगितले आहे.

पुलांवर काळजी घ्या मुंबईमधील १७ पूल धोकादायक जाहिर करण्यात आले आहेत. या पुलांवर नाच गाणी करू नका. १६ टणांहून अधिक भार टाकू नका, शांतपणे मिरवणुक काढा, पर्यायी मार्ग असल्यास त्याचा वापर करा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. अशा ठिकाणी वाहतूक पोलिसांना आणि पालिका कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. याबाबत भाविकांना आवाहनही करण्यात आले आहे. याचे भाविकांनी पालन करावे, असे आवाहन भिडे यांनी केले आहे.

ऑनलाईन नोंदणी करणाऱ्याना प्राधान्य श्री गणेश मूर्ती विसर्जन ऑनलाईन (Ganesha idol immersion online registration) नोंदणी सुविधा ही https://shreeganeshvirsarjan.com या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना विसर्जनाच्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येत आहे. इतरही भाविक विसर्जन स्थळी आल्यास त्यांनाही वेळ न लावता विसर्जन केले जात आहे. अशी माहिती भिडे यांनी दिली आहे.

गणेश भक्तांनी विसर्जनाप्रसंगी काळजी घ्यावी

(१) खोल पाण्‍यात जाण्‍याचा प्रयत्‍न करु नका.

(२) भरती व ओहोटीच्‍या वेळांची माहिती समुद्रकिनाऱयांवर लावण्‍यात आली आहे ती समजून घ्‍या.

(३) मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेच्या प्रशिक्षित मनुष्‍यबळाची मदत घ्‍या.

(४) अंधार असणाऱया ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाकरीता जाण्‍याचा प्रयत्‍न करु नका.

(५) मोठय़ा गणेशमूर्तींबरोबर प्रत्‍यक्ष विसर्जनाकरीता समुद्रात जाणाऱया मंडळाच्‍या कार्यकर्त्‍यांनी शिरगणती करुन जावे.

(६) गणेशमूर्तींचे विसर्जन करताना शक्‍यतो तराफ्यांचा वापर करावा

(७) समुद्रात / तलावात कुणी बुडत असल्‍याचे निदर्शनास आल्‍यास त्‍वरित त्‍याची माहिती अग्निशमन दलाच्‍या जवानांना / पोलिसांना / जीवरक्षकांना द्या.

(८) नाका-तोंडात पाणी गेल्‍यामुळे श्‍वसनाचा त्रास झाल्‍यास तात्‍काळ वैद्यकीय मदत घ्‍यावी

(९) अफवांवर विश्‍वास ठेवू नका व अफवा पसरवू नका.

(१०) भाविकांनी आपल्‍या लहान मुलांची विशेष काळजी घ्‍यावी. त्‍यांना पाण्‍यात / विसर्जनस्‍थळी जाण्‍यापासून मज्‍जाव करावा.

(१२) गणेशभक्‍तांनी मूर्तींचे विसर्जन करतेवेळी पाण्‍यात जेलीफिश चावू नये म्हणून गमबुट घालावेत.

(१३) मद्यप्राशन करुन समुद्रकिनाऱयावर विसर्जनस्‍थळी जाऊ नये, कारण अशा व्‍यक्तिवर मस्‍त्‍सदंशावरील वैद्यकीय उपचारांची परिणामकता घटते.

ABOUT THE AUTHOR

...view details