महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

केंद्राकडून मिळाला लशींचा मोजकाच साठा; मुंबईत पुढील तीन दिवस लसीकरण बंद - मुंबई लसीकरण

मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णाच्या घरी जाऊन त्यांना खरेच बेड्सची गरज आहे का, याची पाहणी केली जात आहे. रुग्णांची वर्गवारी करून त्यांच्या गरजेनुसार सोय केली जात असल्याचे मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी
मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी

By

Published : Apr 29, 2021, 6:44 PM IST

Updated : Apr 29, 2021, 6:54 PM IST

मुंबई -मुंबईमध्ये लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे लसीचा साठा कमी पडत आहे. यामुळे उद्यापासून पुढील तीन दिवस मुंबईत लसीकरण बंद ठेवले जाणार आहे. तसेच मुंबईतील लसीकरणासाठी थेट येणाऱ्या नागरिकांचे लसीकरणही (वॉक इन सिस्टम) बंद केली जाणार असल्याची माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

लसीकरण केंद्रावर पुढील तीन दिवस नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.

मुंबईत पुढील तीन दिवस लसीकरण बंद

हेही वाचा-इथं ओशाळली माणुसकी.. अपशकुनी ठरवून आई-वडीलांनीच केला ११ वर्षीय मुलीचा छळ, अखेर मृत्यू

लसीकरण बंद -
मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयाला आज सुरेश काकाणी यांनी भेट दिली. यावेळी ते म्हणाले, की केंद्र सरकारकडून जो लसींचा साठा मिळतो, तो काल (बुधवारी) रात्री उशीरा प्राप्त झाला. सकाळी लसींचे वाटप केले. त्यामुळे लसीकरण मोहीम १२ वाजल्यानंतर सुरुवात होईल. तसेच ज्यांचा लसीचा दुसरा डोस आहे, त्यांनाच लस देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. ज्या लोकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले, त्यांचाच जास्त विचार केला येईल, असे सांगूनही आज लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. यापुढे ज्यांचा दुसरा डोस आहे, त्यांनाच प्राधान्य दिले जाईल, असे काकाणी यांनी सांगितले. काल (बुधवारी) रात्री मोजकाच लशींचा साठा मिळाला आहे. ७६ हजार डोस मिळाले आहेत. यापैकी दुपारपर्यंत ५० हजारांहून अधिक लसीचे डोस संपले आहेत. त्यामुळे उद्या आम्ही एखाद दुसरे केंद्राचा अपवाद वगळता सर्व केंद्रावर लसीकरण मोहीम पुढील साठा मिळेपर्यंत बंद राहिल, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा-नाशिकमधील आरोग्य यंत्रणा हतबल; बेडसाठी रुग्णालयांच्या दारात याचना करण्याची रुग्णांवर वेळ

म्हणून चाचण्या कमी -
मुंबईत आधी सर्व व्यवहार सुरू असल्याने लोकांची गर्दी होती. त्यामुळे जास्त प्रमाणात चाचण्या केल्या जात होत्या. मुंबईत रेल्वेने येणाऱ्या परप्रांतीय प्रवाशांची चाचणी केली जात होती. पण आता लॉकडाऊन आहे. संशयित कमी आढळून येत आहेत. त्यामुळे चाचण्या कमी केल्या जात आहेत. मुंबईमधील रुग्णसंख्या, पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी होत असल्याची त्यांनी माहिती दिली.

म्हणून बेड्स रिक्त आहेत-
मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णाच्या घरी जाऊन त्यांना खरेच बेड्सची गरज आहे का, याची पाहणी केली जात आहे. रुग्णांची वर्गवारी करून त्यांच्या गरजेनुसार सोय केली जात आहे. त्यामुळे बेड्स कमी लागत आहेत. नवीन १०० आयसीयू बनवले जात असल्याचे काकाणी यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा-अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयने रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला

मृत्यूंचा आढावा घेत आहोत -
रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यू दर कमी होत आहे. आम्ही 'मिशन सेव्ह लाईव्हज'वर काम करत आहोत. मृत्यूंच्या कारणांचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे. जे मृत्यू होत आहेत, त्याच्या कारणांचा शोध घेतला जाणार आहे.

मुंबईत नवीन स्ट्रेन नाही -
मुंबईत कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. यापैकी काही रुग्णांचे सॅम्पल पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेकडे पाठवले जात आहेत. यात सुरुवातीला युके स्ट्रेनचे काही रुग्ण आढळून आले होते. मात्र, त्यानंतर त्या स्ट्रेनचे कोणतेही नवे रुग्ण आढळून आलेले नाहीत असे काकाणी यांनी सांगितले.

डॉक्टरांसाठी कार्यक्रम -
कोरोना विरोधातील लढाईत डॉक्टर्स कोरोना योद्धे म्हणून काम करत आहेत. डॉक्टरांना शारीरिक, मानसिक थकवा आलाय त्यांना पुन्हा जोमाने काम करता यावे यासाठी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. असे कार्यक्रम पालिकेच्या चारही मोठ्या रुग्णालयात केले जातील, असे काकाणी यांनी सांगितले.

Last Updated : Apr 29, 2021, 6:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details