मुंबई - मुंबईकरांच्या घरी आणि विविध परिसरांमध्ये उद्यापासून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत BMC Ready for Ganeshotsav 2022 आहे. मुंबईकरांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका देखील गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सुसज्ज आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन पद्धतीने मंडप परवानगी देण्याची अर्ज प्रक्रिया दिनांक २६ ऑगस्ट २०२२ पर्यंत राबविण्यात आली आहे. या अंतर्गत महानगरपालिकेकडे ३ हजार ४८७ अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती उपायुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार यांनी दिली आहे.
Ganeshotsav 2022 : गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज - मुंबई गणेशोत्सव 2022
मुंबईकरांच्या घरी आणि विविध परिसरांमध्ये उद्यापासून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत BMC Ready for Ganeshotsav 2022 आहे. मुंबईकरांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका देखील गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सुसज्ज आहे.
विसर्जन व्यवस्थेसाठीची जय्यत तयारी -याबाबत अधिक माहिती देताना बिरादार यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सवाची माहिती देणारी माहिती पुस्तिका देखील यापूर्वीच प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे श्रीगणेश गौरव स्पर्धेचे आयोजनही यंदा करण्यात आले असून या स्पर्धेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. त्याचबरोबर यंदाच्या गणेशोत्सवासाठी व विशेष करुन श्रीगणेश मूर्ती विसर्जन व्यवस्थेसाठीचीही जय्यत तयारी महानगरपालिकेने केलेली आहे. दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणा-या श्री गणेशोत्सवा दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलिस दल यांच्याद्वारे देण्यात येणा-या सुचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन महापालिकेद्वारे करण्यात आले आहे.
अशी केलीय व्यवस्था -श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १८८ नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. प्रमुख विसर्जन स्थळी ७८६ जीव रक्षक तैनात केले जाणार आहेत. नैसर्गिक विसर्जन स्थळी आवश्यक तेथे ४५ मोटार बोट व ३९ जर्मन तराफा व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. विसर्जन स्थळी २११ स्वागत कक्ष. चांगल्या प्रकाश व्यवस्थेसाठी ३ हजार ०६९ फ्लड लाईट व ७१ सर्च लाईट व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन स्थळी वैद्यकीय सामुग्रीसह सुसज्ज असणारे १८८ प्रथमोपचार केंद्र व ८३ रुग्णवाहिका असणार आहेत. निर्माल्यापासून खत बनविण्यासाठी निर्माल्य गोळा करण्यास उपयोगी ठरणारे ३५७ निर्माल्य कलश व २८७ निर्माल्य वाहने, ४८ निरिक्षण मनोरे, विसर्जन स्थळी १३४ तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था, वाहनांची चाके वाळूमध्ये रुतू नयेत, यासाठी ४६० पौलादी प्लेटची व्यवस्था, कृत्रिम विसर्जन स्थळांची व्यवस्था, सुमारे १० हजार अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहेत. श्रीगणेश मूर्ती विसर्जन ऑनलाईन नोंदणी सुविधा ही https://shreeganeshvirsarjan.com या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे अशी माहिती.