मुंबई - मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मुंबईमध्ये घरगुती आणि सार्वजनिक अशा एकूण २ लाख मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. या मूर्तीचे दीड, पाच, सात आणि दहा दिवसांनी विसर्जित केल्या जातात. मुंबईत गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने निर्बंध लागू आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत आज शनिवारी(११ सप्टेंबर) दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे.
७३ नैसर्गिक व १७३ ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव -
मुंबई शहरात गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच राज्य सरकार आणि पालिकेने निर्बध लागू केले आहेत. त्यानुसार भाविकांनी विसर्जनस्थळी गणेश मूर्ती पालिका कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करायच्या आहेत. पालिका कर्मचारी गणेश मूर्तींचे विसर्जन करणार आहेत. मुंबईत एकूण ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत. या नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध आहे. तसेच सुमारे १७३ ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्यात आले आहेत. कृत्रिम तलावात भाविकांनी गणेश मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्थळांवर उपलब्ध महापालिकेच्या व्यवस्थापनाकडे मूर्ती सूपूर्द करण्यापूर्वी मूर्तीची पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.
समुद्राला मोठी भरती -
दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन शनिवारी केले जाणार आहे. मात्र शनिवारी (११ सप्टेंबर) दुपारी २.३४ वाजता ४.२२ मीटरची, तर १२ सप्टेंबरला मध्यरात्री ३.१२ वाजता ४.२३ मीटरची समुद्राला भरती आहे. १९ सप्टेंबरला दहाव्या दिवशी अनंत चतुर्थीला सकाळी ११.०८ वाजता ४.३ मीटरची, रात्री ११.२० वाजता ४.८ मीटरची तर २० सप्टेंबरला सकाळी ११.४४ वाजता ४.४० मीटरची भरती असणार आहे. यंदा समुद्रात जाऊन विसर्जन करण्यास बंदी असल्याने दुर्घटना होणार नाही. तरीही पालिका दक्ष असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
विसर्जन स्थळांवर पुरविण्यात आलेल्या सुविधा -