मुंबई - मुंबई पोलीस, मुंबईच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौत हिला शिवसेनेने जशाच तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. आज त्याचाच एक भाग म्हणून मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंगना रणौतच्या वांद्रे पालीहिल येथील कार्यालयाची पाहणी केली. कंगनाच्या कार्यालयाचे दुरुस्तीचे काम सुरू असून, तिने अतिक्रमण केले आहे का? याची तपासणी करण्यात आली आहे.
कंगना रणौतच्या 'मणिकर्णिका' कार्यालयाची पालिका अधिकाऱ्यांकडून तपासणी - कंगना रणौत लेटेस्ट न्यूज
अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाक ऑक्युपाय काश्मीरशी केली आहे. मी मुंबईत येत असून, कोणामध्ये हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असेही वक्तव्य कंगनाने केले होते.
अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाक ऑक्युपाय काश्मीरशी केली आहे. मी मुंबईत येत असून, कोणामध्ये हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असेही वक्तव्य कंगनाने केले आहे. यामुळे मुंबई महापालिकेवर व राज्यात सत्ता असलेल्या शिवसेनेने कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मुंबई कंगनाची कर्मभूमी असताना तिने असे वक्तव्य केल्याने शिवसेनेमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
कंगनाविरोधात शिवसेनेने विविध ठिकाणी आंदोलनही केले आहे. कंगना रणौतच्या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू झाले आहे. आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यानंतर आता कंगनाच्या वांद्रे पालिहिल येथील कार्यालयाची पाहणी पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. नियमानुसार या कार्यालयाचे बांधकाम झाले आहे का? बेकायदेशीर बांधकाम झाले आहे का? याची पाहणी आज पालिका अधिकाऱ्यांनी केली. कंगनाच्या कार्यालयाचे सुशोभीकरण सुरू असताना पालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याने यात बेकायदेशीर बांधकाम केल्याचे उघड झाल्यास कार्यालयावर कारवाई केली जाऊ शकते.