महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BMC issues Fresh Guidelines : मुंबईतील रहिवासी इमारतींसाठी नवी नियमावली जारी; वाचा नियम... - मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढली

कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) झपाट्याने वाढत आहे. मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना रुग्ण आढळून आलेली इमारत सील करण्याबाबतही महापालिकेने नवी नियमावली जाहीर (BMC issues Fresh Guidelines) केली आहे.

BMC
मुंबई पालिका

By

Published : Jan 4, 2022, 4:29 AM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) झपाट्याने वाढत आहे. मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे मुंबई पालिकेने कोरोना निर्बंध (Corona Restrictions) कडक करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर मुंबईतील शाळा बंद ठेण्याचा निर्णय (Schools Closed) सोमवारी घेण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता कोरोना रुग्ण आढळून आलेली इमारत सील करण्याबाबतही महापालिकेने नवी नियमावली जाहीर (BMC issues Fresh Guidelines) केली आहे.

मुंबईत सोमवारी 8 हजार 82 कोरोना रुग्णांची नोंद -

मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला १०८ रुग्ण आढळून आले होते. त्यात वाढ होऊन २ जानेवारीला ८ हजार ६३ रुग्णांची नोंद झाली होती. सोमवार, ३ जानेवारीला ८ हजार ८२ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, २ मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या वाढली असली तरी, बहुसंख्य रुग्ण हे लक्षणे नसलेले असल्याने रुग्णालयातील ९० टक्के बेड रिक्त आहेत. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईकरांचे व आरोग्य विभागाचे टेंशन वाढले आहे.

मुंबईतील रहिवासी इमारतीच्या एकूण क्षमतेपैकी 20 टक्के नागरिक कोरोनाबाधित आढळून आल्यास संपूर्ण विंग किंवा इमारत सील करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. कोरोना रुग्ण आढळलेल्या इमारतीतील रहिवाशांसाठी महापालिकेने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असणार आहे. महापालिकेची ही नियमावली आतापासूनच लागू होत असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. मुंबईत वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ही नवी नियमावली महापालिकेने लागू केली आहे.

नवी नियमावली काय?

  • इमारतीच्या किंवा विंगच्या एकूण क्षमतेपैकी 20 टक्के रहिवारी कोरोनाबाधित आढळून आल्यास संपूर्ण इमारत किंवा विंग सील केली जाईल.
  • इमारतीत कोरोना रुग्ण आढळून आल्यास रुग्ण आणि त्या कुटुंबाला अन्न, औषध तसंच दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरावा केला जाईल याची काळजी सोयायटीच्या कमिटीने घ्यावी.
  • रुग्णांना लक्षणं दिसून आल्यास किमान 10 दिवस आयसोलेट राहणे बंधनकारक आहे.
  • आयसोलेट आणि होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणं गरजेचं आहे.
  • हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या नागरिकांनी 7 दिवस होमक्वारंटाईन राहावे. तसेच 5 ते 7 दिवसांच्या आत कोरोना चाचणी करावी.
  • पालिकेचे आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इमारतीच्या कमिटीने सहकार्य करावे
  • इमारती सीलमुक्त करण्याचा निर्णय वॉर्ड स्तरावर घेतला जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details