मुंबई -महापालिका कँटीनमध्ये दररोज हजारो कर्मचारी, नागरिक अल्पोपहार आणि जेवणासाठी येत असतात. मात्र, त्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. या कँटीनमध्ये मोठ्या प्रमाणात झुरळांचा संचार आढळून येत आहे. त्यामुळे कँटीनच्या स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मुंबई महापालिकेच्या कँटीनमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष, झुरळांचा वावर वाढला - अल्पोहार
मुंबई महापालिका मुख्यालयाच्या कँटीनमधील दुरावस्था समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या बी विभागातील कँटीनमधील अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती. त्यावेळी ९ पालिका कर्मचारी आणि एक कँटीनमधील कर्मचारी अशा १० जणांना जे.जे. रुग्णालयात दाखल करावे लागले होते. मात्र, त्यानंतरही पालिका अधिकारी आणि कँटीन चालविणाऱ्या कंत्राटदाराने या प्रकरणातून कोणताही बोध घेतला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पालिकेचे आरोग्य विभागातील अधिकारी आणि आरोग्य समिती अध्यक्ष यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.