महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत 15 वृक्षांची अनधिकृतपणे छाटणी; पालिकेने केला गुन्हा दाखल - मुंबईत वृक्षांची अनधिकृतपणे छाटणी

मुंबईतील गजबजलेल्या लोअर परेल परिसरामध्ये रेल्वेच्या हद्दीत असलेल्या होर्डिंग्सला अडथळा येणाऱ्या 15 तामण वृक्षांची छाटणी करण्यात आली आहे.

bmc
बीएमसी

By

Published : Jun 7, 2021, 3:10 PM IST

मुंबई - मुंबईतील लोअर परेल परिसरामध्ये असलेल्या 15 तामण वृक्षांच्या अनधिकृतपणे केलेल्या छाटणी प्रकरणी मुंबई महानगरपालिकेकडून एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

हेही वाचा -नौदलाच्या अधिकाऱ्याविरोधात बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबईतील गजबजलेल्या लोअर परेल परिसरामध्ये रेल्वेच्या हद्दीत असलेल्या होर्डिंग्सला अडथळा येणाऱ्या 15 तामण वृक्षांची छाटणी करण्यात आलेली आहे. जवळपास 20 फूट उंच असलेल्या या वृक्षांना छाटून 6 फुटांपर्यंत आणण्यात आले असल्यामुळे यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा अज्ञात व्यक्तीच्या विरोधात एन एम जोशी मार्ग पोलिसांनी दाखल केला आहे. दरम्यान, या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, या अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर माहिती देताना सांगितले आहे की, सदरचे होर्डिंगस रेल्वेच्या हद्दीत येत असल्यामुळे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या संदर्भातील माहिती रेल्वेच्या संबंधित विभागाला पाठवण्यात आलेली आहे.

हेही वाचा -बाळासाहेब थोरात यांनी घेतली शरद पवारांची भेट; महामंडळ वाटपावर चर्चा?

ABOUT THE AUTHOR

...view details